Big Breaking News ! चाकण हनुमंत देवकर ! पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून तीन सख्ख्या भावडांचा दुर्दैवी मृत्यू...!

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
चाकण : हनुमंत देवकर
चाकण एमआयडीसी : आंबेठाण गावातील लांडगे वस्तीवर गट नंबर २३२ मध्ये एका खाजगी व्यक्तीने खड्डा उकरून ठेवला असता त्यात, खेळता खेळता ३ भावडांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहार येथील किशोर दास यांचे कुटूंब कामाच्या निमित्ताने लांडगे वस्ती येथे भाड्याने राहत होते. त्यांचे हे मृत्यू पावलेले तीन अपत्य होते.

किशोर दास हे मूळ बिहार राज्यातील रहिवाशी आहेत. ते पेंटर काम करून उदर्निवाह करतात. त्यांना एकूण चार अपत्य आहेत. त्यातील रोहित दास (वय -८), राकेश दास (वय -६), श्वेता दास (वय -४) असे मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. एका बेजबाबदार व्यक्तीने हा खड्डा करून ठेवल्याने हा मोठा अनर्थ झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी मदत कार्य टिम व महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस प्रशासन दाखल झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी वाय. सी. एम हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली  महाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
0000
To Top