सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोरटेवाडी ता बारामती येथील सिद्धीराजनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पातसंस्थेच्या अध्यक्षपदी तानाजीराव आण्णासो सोरटे तर उपाध्यक्षपदी वसंतराव विष्णु लोखंडे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
आज दि १२ रोजी संस्थेच्या कार्यालयात ही निवड पार पडली. बारामतीचे सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना सचिव नितीन मिंड आणि वसुली अधिकारी विजय लाखे यांनी सहकार्य केले. निवडीनंतर अध्यक्ष तानाजीराव सोरटे म्हणाले, संस्थेच्या पुढील काळात संस्था अजून भक्कम करण्यासाठी प्रयत्न करणार असून संस्थेची वाटचाल अशीच चालू राहील अशी ग्वाही देत नियमित कर्ज फेड करणाऱ्या सभासदांना प्राधान्याने कर्ज देण्यात येईल असे म्हणाले.
-----------------------
नवनिर्वाचित संचालक मंडळ------
जालींदर आण्णासो सोरटे
संतोष पानाचंद टाटीया
संजय भानुदास सोरटे
गणेश बापुराव माळशिकारे
अनिल वसंत सोरटे
शिवाजी दत्तात्रय काकडे
जमीर बाबालाल शेख
किशोर भिकाजी नलवडे
संभाजी नानासो माळशिकारे
छाया दादासो सोरटे
मंगल बापूराव सोरटे