सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जावली : धनंजय गोरे
मेढा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांचे निधन झाल्यास आता त्याच्या अंत्यसंस्कारासाठी नगरपंचायतीकडून चार हजार रुपये अंत्यसंस्कार सहाय्यता निधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे गोरगरीब कुटुंबांना दिलासा मिळणार आहे तसेच मेढा बाजारचौकाचे छ शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे
मेढा नगरपंचायतीच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत महत्वाच्या ठरावांना मंजुरी देण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पांडुरंग जवळ होते उपनगराध्यक्षा कल्पना जवळ व नगरसेवक यावेळी उपस्थित होते
मेढा नगरपंचायतीची शेवटची सर्वसाधारण सभा संपन्न झाली त्यात नगरसेवक शशिकांत गुरव यांनी मेढा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यसंस्कारासाठी ४००० रु अंत्यसंस्कार सहाय्यता निधी मिळावा असा ठराव मांडला त्याला माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी अनुमोदन दिले सर्व नगरसेवकांनी हा महत्वपूर्ण ठराव म्हणत त्याला पाठिंबा देत बहुमताने मंजूर करण्यात आला तसेच मेढ्यातील मोठा चौक असलेल्या बाजार चौकाला छ शिवाजी महाराज चौक असे नामकरण करावे ही मागणी मेढा शहर भाजपाच्या वतीने करण्यात आली होती त्या मागणीला अनुसरून तोही ठराव नगरसेवक शशिकांत गुरव यांनी मांडला या ठरावाला माजी नगराध्यक्ष अनिल शिंदे यांनी अनुमोदन दिले व हाही ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला
अंत्यसंस्कारासाठी चार हजार रुपये सहाय्यता निधी मिळणार असल्याने गोरगरीब जनतेची मोठी अडचण दूर होणार आहे नगरसेवक शशिकांत गुरव यांच्याकडे अनेक नागरिकांनी अंत्यसंस्कारासाठी नगरपंचायतीकडून काहीतरी निधीची तरतूद करावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती त्यानुसार नगरसेवक शशिकांत गुरव यांनी सभागृहात हा ठराव मांडला व त्याला सर्वच सदस्यांनी मंजुरी दिली आहे तसेच छ शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले मेढा शहर असून त्यांचे स्मरण कायम व्हावे व शिवस्मृतींना उजाळा मिळावा या हेतूने बाजार चौकाला छ शिवाजी महाराज चौक नाव देण्याचा ठरावही नगरसेवक गुरव यांनी मांडला त्यालाही मंजुरी देण्यात आली याशिवाय विविध विकास कामांना या सभेत मंजुरी देण्यात आली
या सभेत नगरसेवक दत्तात्रय पवार,अनिल शिंदे,शशिकांत गुरव,विकास देशपांडे, नारायण देशमुख,द्रोपदा मुकणे,संजना सावंत,शुभांगी गोरे,गौरी पवार आदी नगरसेवकांनी विकासकामांवरील चर्चेत सहभाग घेतला
--------------------
नगरपंचायत सभेत अंत्यसंस्कार सहाय्यता निधीचा विषय ऐनवेळच्या विषयात मंजूर करण्यात आला आहे निधी वाटपाबाबत विषय असल्याने तो विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घ्यावा लागेल व मंजुरी घेऊन त्याची अंमलबजावणी सर्व कायदेशीर बाबी पडताळून करण्यात येईल सभेत ठराव होऊन मंजुरी मिळाली आहे त्यामुळे अंत्यसंस्कार सहाय्यता निधी मिळेल पण त्याला थोडा वेळ जाणार आहे
अमोल पवार, मुख्याधिकारी
नगरपंचायत मेढा