बारामती ! तलवारीचा धाक दाखवत १ लाखांचे सोने लुटून पळून चाललेल्या चोरास ग्रामस्थांनी पकडले : पळशी येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पळशी ता बारामती येथे महिला एकटी घरात असल्याचे पाहून एकाने तलवार काढुन फिर्यादीच्या गळ्याला लावुन तु घरातील पैसे व दागिने काढुन दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवुन त्याने फिर्यादीचे गळ्यातील दोन तोळे वजनाचे १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठन चोरून पळून जात असताना ग्रामस्थांनी त्या चोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. 
        याबाबत पळशी ता. बारामती जि.पुणे येथील महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून महेश लक्ष्मण धायगुडे रा. तरडोली ता. बारामती जि.पुणे याच्यावर वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. 
          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी ही तिचे घरी असताना यातील आरोपी हा फिर्यादीचे घरात घुसुन फिर्यादीने त्यास आपण घरात कसे आला असे विचारताच त्याने घराचा दरवाजा आतुन लावुन त्याचेकडील सँक मधील तलवार काढुन फिर्यादीच्या गळ्याला लावुन तु घरातील पैसे व दागिने काढुन दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवुन त्याने फिर्यादीचे गळ्यातील दोन तोळे वजनाची किंमत रु १ लाखाचे सोन्याचे गंठन जबरदस्तीने हिस्का मारुन  घेवुन पळुन जात असताना फिर्यादीने त्यास विरोध केला असता त्याने तिचे हातातील तलवारीने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर मारुन जखमी केले आहे सदरचा आरोपी पळुन जात असताना आजुबाजुचे लोकांनी त्यास पकडले असता त्याच्या खिश्यात २ तोळे वजनाचे सोन्याचे गंठन मिळुन आला आहे. दरम्यान बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. 
 पुढील तपास सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई शेख हे करीत आहेत.
To Top