शिरोळ ! प्रतिनिधी : चंद्रकांत भाट ! नगरपरिषदेच्या वतीने 'भूमी नर्सरी” मधून रोपांची निर्मिती : न पा कर्मचाऱ्याचे योगदान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरोळ : चंद्रकांत भाट
 शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने शिरोळ शहरात माझी वसुंधरा अभियान ३.० भूमी (पृथ्वी) उपक्रम अंतर्गत "भूमी नर्सरी” मध्ये नव्याने रोपे तयार केली जात आहेत, नगरपरिषद कर्मचारी यांच्या मेहनतीतून रोपवाटिका सुरू असून  शहरातील  विविध भागात तयार रोपांची लागवड केली जात आहे, शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने येत्या वर्षभरात साडेचार हजार वृक्षारोपण करण्यात येणार आहे, त्या दृष्टीने विविध प्रकारची रोपे तयार करण्याचे काम नगरपालिकेचे कर्मचारी करीत आहेत,
        दरम्यान, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील , मुख्याधिकारी तैमूर मुलांनी यांच्यासह शिरोळ नगरपालिका समन्वयक मकानदार यांच्या विशेष प्रयत्नातून नगरपरिषदेची रोप नर्सरी सुरू झाली असून येथील श्री बुवाफन मंदिर नजिक असणाऱ्या नगरपरिषदेच्या नळ पाणी पुरवठा टाकीजवळ रोपवाटिका आहे, दैनंदिन कामातील थोडा वेळ काढून काही कर्मचारी शासन मान्यताप्राप्त हे ऑक्सीजन पूरक विविध प्रकारची रोपे तयार करीत आहेत, त्यासाठी लागणारे पाणी ,माती मिश्रण आणि बीज याबाबत योग्य ती दक्षता घेऊन वृक्षरोपे तयार केली जात आहे,  घरगुती बियाणे विक्रेते कडून प्राप्त झालेल्या काही बियाची उगवण झालेली नाही, त्यामुळे याबाबत त्यांच्याकडे चौकशी करून पुन्हा जादा बीज उपलब्ध करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले,
-------------------
      शिरोळ शहरात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन मोहीम गतिमान करण्यात येत असून  सुमारे 300 हून अधिक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे, येत्या वर्षभरात शहरात
 ४ हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे, त्याचे संवर्धन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे, शिरोळ शहर स्वच्छ ,सुंदर व हिरवाई करण्यासाठी नगरपरिषदेचा हा विशेष उपक्रम राबवताना नगरपालिकेचे नगरसेवक, कर्मचारी व ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळत आहे,
-- अमरसिंह पाटील 
नगराध्यक्ष, नगरपरिषद शिरोळ
--------------
वृक्ष लागवड ही शासनाची संकल्पना आहे, जास्तीत जास्त रोपांची लागण होवून त्याचे चांगले संगोपन व्हावे, याकरिता विशेष लक्ष देण्यात येत आहे, नगरपरिषदेच्या माध्यमातून
 रोपांची नर्सरी करताना बीज उपलब्ध केले आहे, यामध्ये भारतीय प्रजातीचे करंज, सिताफळ, हिरडा, साग, चिंच अशा एकूण ९५० प्रकारचे बिज रोपण करण्यात येत आहे,  नर्सरीमध्ये वृक्ष लागवडीसाठी 300 रोपे तयार झालेली असून सुमारे चार हजार रोपे  तयार करण्याचे काम सुरू आहे,
---  साहिल मकानदार
 समन्वयक, शिरोळ नगरपरिषद
To Top