सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील वेताळपेठ येथील नामवंत उद्योजक राज विठ्ठल सपकाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरनानिमित्त सपकाळ कुटुंबीयांकडून 300 फुल झाडांचे वाटप करण्यात आले.
उद्योजकता सांभाळत सामाजिक कार्यात हिरीरीने काम करणारे तसेच उच्चशिक्षित राज सपकाळ यांचा स्मृतिगंध या फुल झाडांच्या रूपाने दरवळत राहावा म्हणून फुल झाडांचे वाटप करण्यात आले असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. प्रथम पुण्यस्मरन दिनानिमित्त फुल झाडांचे वाटप हा नावीन्यपूर्ण उपक्रम सपकाळ कुटुंबीयांनी राबविल्याने शहरातून कौतुक होत आहे. प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आमदार संग्राम थोपटे यांनी कुटुंबीयांना भेट घेऊन राज सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी शेकडो नातेवाईक उपस्थित होते.