सोमेश्वर रिपोर्टर टीम----
शिरवळ : प्रतिनिधी
दगडेवस्ती होडी भादे ता. खंडाळा जि. सातारा येथे उसने पैसे मागितल्याचे कारणावरुन चिडून जावून मानेवर कु-हाडीने वार करीत उमेश पुरंधर काळे वय २४ वर्षे रा. दगडेवस्ती होडी भादे ता. खंडाळा जि. सातारा याचा खुन करुन गेल्या तीन महीन्यापासून फरार असलेल्या तिघांना शिरवळ पोलीसांनी मोठ्या शिताफिने स्थानिक गुन्हे अन्वेशन सातारा, यवत पोलीस ठाणे पुणे ग्रा., मंगळवेढा पोलीस ठाणे सोलापुर ग्रा. यांचे संयुक्त विद्यमाने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
याबाबतची माहीती अशी की, ता. ०१/०५/२०२२ रोजी सायंकाळी ०५.३० वा चे , होडी भादे ता. खंडाळा जि. सातारा गावचे हद्दीत दगडेवस्तीवर मैनेश मुकेश भोसले, निलेश मुकेश भोसले, सुमारास दगडेवस्ती महेश मुकेश भोसले, राजनंदिनी महेश भोसले, सर्व रा. दगडेवस्ती होडी भादे ता. खंडाळा जि. सातारा यांचे उसने पैसे परत मागितलेच्या कारणावरुन चिडून जावून निलेश मुकेश भोसले, महेश मुकेश भोसले, राजनंदिनी महेश भोसले यांनी धरुन ठेवून मैनेश मुकेश भोसले याने उमेश पुरंधर काळे याचे गळ्यावर कु-हाडीने मारुन त्याचा जीवे मारुन टाकले होते. म्हणून त्यांचेविरुध्द पत्नी रजनी उमेश काळे हिने शिरवळ पोलीस ठाणेस संबधितांविरुध्द तक्रार दाखल केली होती त्यानंतर ते सुमारे तीन महीने पोलीसांना गुंगारा देत सातारा, पुणे, सोलापुर, सांगली जिल्ह्यात फिरत होते.
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा, अजित बोहाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा, तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग, किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, नवनाथ मदने पोलीस निरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा, अजित बोहाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग, यांनी सदरचा गुन्हयातील आरोपीचा तात्काळ शोध घेवून त्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखा, व शिरवळ पोलीस ठाणेस दिल्या. यावेळी संबधीत आरोपी हे परजिल्ह्यामध्ये वावरत असल्याचे तपासात निष्पन्न होताच पोलीस निरिक्षक मदने सो यांचे आदेशाने शिरवळ पोलीस ठाण्याकडील सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार यांचे अधिपत्त्याखाली तपास पथके तयार करुन यवत पोलीस ठाणे पुणे ग्रा. पोलीसांनी राजनंदिनी महेश भोसले वय २७ वर्षे हीला पकडण्यात यश मिळविले असता यावेळी महेश भोसले हा घटनास्थळावरुन फरार झाला होता त्यावेळी शिरवळ पोलीस ठाणेचे स्टाफ व स्थानिक पोलीसांच्या मदतीने प्रसिध्द बोरमलनाथ मंदीर परिसरात उसाचे शिवारात तब्बल तीन तास शिथापीने पकडण्याचा प्रयत्न केला त्यात महेश भोसले हा पळुन जाणेस यशस्वी झाला त्यानंतर शिरवळ पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा सातारा यांचे सहकार्याने महेश भोसले याला मोठ्या शिताफीने पकडन्यात यश मिळविले आहे. दरम्यान यातील ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल व बारकाईने विचारपूस करुन त्यानी दिलेल्या माहितीवरुन तिसरा आरोपी निलेश मुकेश भोसले याला सोलापुर ग्रामीण मधील मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीतील पाण्याच्या टाकीजवळ हाजापुर ता. मंगळवेढा जि. सोलापूर येथून पकडण्यात यश आले.
अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक, सातारा, अजित बो-हाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा, तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग, किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, नवनाथ मदने पोलीस निरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे यांचे आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक आर.पी. भुजबळ पोलीस उपनिरिक्षक एस. जी. आंदेलवार सफौ पांडूरंग हजारे, पो. हवा. जितेंद्र शिंदे, आप्पासो कोलवडकर, सचिन वीर, पो.ना. नितिन महांगरे पो.काँ. प्रशांत वाघमारे, भाऊसाहेब दिघे, मंगेश मोझर, तुषार अभंग, अजित बोराडे तसेच पुणे ग्रामीन यवत पोलीस ठाणेचे पो. नि. नारायण पवार सहा. पोलीस निरिक्षक स्वप्नील लोखंडे, पो.ना विशाल जाधव अजित काळे पो.काँ राहूल गरदे व सोलापुर ग्रामीण मंगळवेढा पोलीस ठाणे पोलीस ठाणेचे रात्रगस्त अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक बामणे व अंमलदार पोना जाधव पोकाँ जाधव, तळवार, आहे. कोळी, मपोक सावंत तसेच यवत पोलीस ठाणेचे यांनी सदरची कारवाई केली.