फलटण ! साखरवाडीची चंदाबाई गेली २० वर्ष करत होती लपूनछपून गांज्याची विक्री : साखरवाडी पोलिसांनी मुसक्या आवळत केला ६१ हजार रुपये किमंतीचा गांजा जप्त

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
साखरवाडी : प्रतिनिधी
फलटण ग्रामीण पोलीसानी साखरवाडी येथे छापा टाकून अवैध गांजा विक्री करणाऱ्या चंदाबाई बाळू जाधव या संशयित महिलेस ६१ हजार ५०० रुपये किमतीच्या गांजा सहित अटक केली आहे.
        याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजे साखरवाडी येथे चंदाबाई बाळु जाथव हि गांजा विक्री करत असलेची खात्रीशिर बातमी मिळालेने त्यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक थोंगडे , सहा . पोलीस फौजदार विलास यादव , पो . हवा . मोहन हांगे, रूपाली भिसे, निखील गायकवाड, गणेश अवघडे यांचे एक पथक तयार करून पोलीस पथकाने वेषांतर करून साखरवाडी भागात जावुन गोपनिय माहिती घेवुन आंबेडकरनगर साखरवाडी येथील चंदाबाई बाळु जाधव ही तीचे राहते घराचे आडोशाला बेकायदेशिर चोरटी गांज्याची विक्री करीत असल्याचे निदर्शनास  आल्याने तिला अटक करून तिच्यावर  भा द वि ५१०/२०२२ गुंगीकारक औषधद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १ ९ ८५ चे कलम २० ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे . तरी कोणात्याही वेक्तीस अवैध्य धंदयाबाबत माहिती मिळताच संपर्क क्र .८९७५२६८२२/ ००/२१६६- २२२५३३ वर माहिती दयावी . माहिती देणा याचे नाव गोपनिय ठेवणेत येईल असे आवाहन फलटण ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे.
----------------
साखरवाडीत अवैध धंद्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात वाढले असून अवैद्य दारू, गांजा, जुगार, मटका, अवैद्य वाळू, मुरूम विक्री व वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
To Top