सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा खोऱ्यातील वीर धरण १०० टक्के भरले असून त्यापाठोपाठ गुंजवणी ८० टक्के भरले आहे. मात्र वीर आणि गुंजवणी ही कमी टीएमसी ची धरणे असून जास्त टीएमसी पाणी साठा करणारी भाटघर आणि नीरा देवघर ही धरणे मात्र अजूनही अर्ध्यावरच आहेत.
भाटघर धरण क्षेत्रात ४७७ मीमी पावसाची नोंद झाली असून ६०.०२ टक्के पाणी साठा झाला आहे. निरा देवघर धरण क्षेत्रात १०९० मीमी पावसाची नोंद झाली असून ५३.०८ टक्के धरण भरले आहे. तसेच वीर धरण क्षेत्रात १५६ मी मी पावसाची नोंद झाली असून ९८ टक्के धरण भरले आहे तर गुंजवणी धरण क्षेत्रात १२४४ मी मी पावसाची नोंद झाली असून ७८.१४ टक्के धरण भरले आहे.