सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी
नीरा ( ता.पुरंदर) येथील प्रसिद्ध फँमिली फिजीशीएन डॉ.निरंजन उर्फ चकोर शहा यांना सासवड येथील ग्रामिण संस्थेच्या वतीने 'हेल्थ एक्सलन्स अवार्ड-२०२२' या पुरस्कारानेे पुरंदरचे माजी आ. अशोकराव टेकवडे यांच्या हस्ते व पुरंदरचे आ.संजय जगताप यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
सासवड ( ता.पुरंदर) येथील ग्रामिण संस्थेच्या वतीने रविवारी ( दि.२४) कोरोना काळात निर्भिडपणे , उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणा-या पुरंदर तालुक्यातील डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पुरंदरचे आ.संजय जगताप, ग्रामिण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, माजी आमदार अशोकराव टेकवडे, पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते, सासवडचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, अनिल उरवणे, मनिषा काकडे, सुनिता कोलते यांच्यासह ग्रामिण संस्थेचे पदाधिकारी , पुरस्कारार्थी डॉक्टर्स उपस्थित होते.
नीरा ( ता.पुरंदर) येेेेथील प्रसिद्ध फँमिली फिजीशिएन डॉ.निरंजन उर्फ चकोर शहा हे ३९ वर्षापासून वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकट काळात हजारो रूग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा देऊन जीवदान दिले. कोव्हिड काळात निरा येथे उभारलेले ५० बेडच्या विलगीकरण कक्षातील रूग्णांना सहा महिने विनामानधन आरोग्यसेवा दिली. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची ग्रामिण संस्थेने दखल घेत 'हेल्थ एक्सलन्स अवॉर्ड - २०२२' हा पुरस्कार देऊन सन्मानित
करण्यात आले.
डॉ. निरंजन शहा यांना मिळालेल्या 'हेल्थ एक्सलन्स अवॉर्ड - २०२२' या पुरस्काराबद्दल त्यांचे नीरा व परिसरातील विविध क्षेञातून अभिनंदन होत आहे.