बारामती ! बंडखोरांचे सरकार फार काळ टिकणार नाही : अमोल मिटकरी ! जळगाव सुपे येथे मॅरेथॉन स्पर्धा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव सुपे श्री दत्तकृपा सेवा प्रतिष्ठान जळगाव सुपे व वसतिगृह विद्यालय काऱ्हाटी यांचे संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र विधान मंडळाचे विरोधी पक्षनेत अजित पवार साहेब वाढदिवसाचे अवचित्त साधून माळवाडी येथील लोणी ते वसतिगृह विद्यालय काऱ्हाटीपर्यंत तीन किलोमीटर लांबीची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. 
        स्पर्धेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.  यावेळेस तालुकास्तरीय १७ वर्षाखालील झालेल्या स्पर्धेसाठी बारामती तालुक्यातील २५ शाळांमधील ४८० मुलांनी भाग घेतला तसेच मुलींच्या झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत ४३० मुलींनी भाग घेतला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व आमदार अमोल मिटकरी  यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
        यावेळेस बारामतीचे ज्येष्ठ नगरसेवक व मॅरेथॉन स्पर्धेचे मार्गदर्शक किरण गुजर नगरसेवक अभिजीत चव्हाण बिरजू मांढरे दत्तकृपा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष  रामचंद्र जगताप खरेदी विक्री संघाचे संचालक लक्ष्मणराव जगताप स्पर्धा समन्वय समितीचे अध्यक्ष व संयोजक  कैलास जगताप उपस्थित होते.     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष  दशरथ धुमाळ हे होते मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांमधील उपजत गुणांचे कौतुक करून भावी खेळाडू घडविण्याबरोबरच सन २०१४ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी चांदा ते बांदा पिंजून काढण्यासाठी दादांच्या पायांमधील स्नायूंना ताकद देण्यासाठी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने भरविण्याचे प्रयोजन असल्याचे स्पर्धा समितीचे संयोजक कैलास जगताप यांनी दिली. मॅरेथॉन स्पर्धेचा आर्थिक भार दत्तकृपा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र जगताप यांनी केल्याबद्दल आमदार अमोल मिटकरी यांच्या शुभहस्ते रामचंद्र जगताप यांचा सत्कार करण्यात आला. 
         यावेळी बोलताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले किरण गुजर यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची ओळख झाली व एका गरीब कुटुंबातील युवकाला अजित पवार यांनी आमदार बनवले त्यांचे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही.  सध्याचे बंडखोरांचे सरकार फार काळ टिकणार नाही पुन्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवारच होतील असा दृढ आत्मविश्वास असल्याचे आमदार मिटकरी यांनी सांगितले. 
       या मॅरेथॉन स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक लक्ष्मण मेटकरी, अशोक देवकर, आबासाहेब कोकरे, पर्यवेक्षक आबासाहेब पिसाळ,  आल्लाबक्षी  शेख विद्यालयाच्या प्राचार्य कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.
To Top