सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सिद्धटेक : प्रतिनिधी
अष्टविनायक स्थान असलेल्या श्री सिद्धिविनायक ‘सिद्धटेक’ मंदिरात आजपासून कर्मचाऱ्यांनी सामूहिक काम बंद आंदोलन सुरू केलेम. देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळाची मनमानी तसेच भ्रष्टाचारी व्यवस्थापकाची चौकशी आणि हकालपट्टी करावी ही प्रमुख मागणी आहे.
गेली अनेक वर्ष कर्मचाऱ्यांच्या असलेली खदखद या आंदोलनामुळे समोर आलीय.चिंचवड देवस्थान ट्रस्ट या राज्यातील सर्वात मोठे संस्थेत प्रथमच कर्मचारी एकत्र येऊन हे आंदोलन उभे राहिले आहे. अष्टविनायकातील मोरगाव, थेऊर सिद्धटेक सह चिंचवड ही धार्मिक ठिकाणे या देवस्थान ट्रस्टच्या अधिपत्याखाली आहेत. या संस्थेत कार्यरत असणारे कर्मचारी यांना गेल्या अनेक वर्षांवर्ष तुटपुंजा पगार दिला जातो. या संस्थेचे विश्वस्त मंडळ मनमानी करीत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.
संस्थेतील दोन कर्मचाऱ्यांच्या आकस व सुड बुद्धीने बदल्या केल्याच्यानिषेधार्थ आज सर्वजण एकत्र आले आहेत. संस्थेतील एकूण कंत्राटी व कायम सुमारे 35 कर्मचारी एकत्र हे आंदोलन सुरू आहे.
-------------------
सिद्धटेक ‘ग्रामपंचायत’ व ग्रामस्थांचा कर्मचाऱ्यांना पाठिंबा
येथे काल आंदोलन सुरू करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या वतीने चिंचवड देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ व प्रशासनातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आहेत. या संबंधी माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी मंदिरात येऊन कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला. तसेच हे संपूर्ण आंदोलन यशस्वी करण्यासाठी संपूर्ण गावकरी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत.