सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने युवा कार्यकर्ते मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम पुणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व भोर तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा ग्रामीणचे संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे व भोर तालुकाध्यक्ष जिवन कोंडे होते. यावेळी पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण दगडे पाटील यांनी आगामी काळात युवा मोर्चा तालुक्यामध्ये अधिक सक्षम व बळकट करण्यासाठी हवी ती मदत व शासकीय निधी सत्तेच्या मार्फत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.यावेळी त्यांनी दिले.
तसेच पुणे जिल्हा ग्रामीणचे संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे यांनी संघटनात्मक बांधणी आढावा,हर घर तिरंगा अभियान,७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे नियोजन तसेच पदाधिकारी संवाद या महत्वपूर्ण विषयांंविषयी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.यावेळी संघटक सरचिटणीस पुणे जिल्हा संदिप सातव, अमोल शिवले, सुरज चव्हाण, संकेत पासलकर, शरद आव्हाळ, विश्वासजी ननावरे,नागेंद्र चोबे, विजयकुमार वाकडे, संदीप सातव मनीषा राजीवडे,अभिजित कोंडे, कपिल दुसंगे,समीर निगडेकर, महेश तांगडे,शिवाजीराव देशमुख,विनोद चौधरी, दीपक मालुसरे, निलेश कोंडे, संतोष लोहकरे, अमर ओसवाल, अमोल पिलाने, सचिन म्हस्के, बापू सावले, शुभम पासलकर, पंकज खुर्द, शिवम शिळीमकर, विनायक गायकवाड, ओंकार गोरड, दत्तात्रय झांजले पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.