सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी
बापू हे वागणं बरं नव्हं, तुम्ही दोन पायावर गेला असता तर ठीक होत; पण तुम्ही आम्हाला टांग मारून गेलात. आशा शब्दात शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांनी माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्यावर कडाडून टीका केली.
आगामी सासवड जेजुरी नगर परिषद निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार शिवसेनेचे उपनेते सचिन आहीर स्पष्ट केले. आगामी काळात येणाऱ्या नगरपरिषदांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचे आमदार साचिन आहीर व उपसभापती नीलम गोरे यांनी म्हटले आहे. आहीर हे आज सासवड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत पुरंदर मधील शिवसैनिक व नेते उपस्थित होते.
---------------
आमदार खासदार गेले पण शिवसैनिक जगगेवरच ; सचिन आहीर
शिवसेनेतून आमदार गेले ते आता स्वताला नेते म्हणून घेतायत, शिवसेना आमची म्हणातायत्त, पण त्यांच्या पाठीमागे एकही शिवसैनिक नाही.आता ज्यांच्या जीवावर ते नेते झाले तेच त्यांच्या पाठीमागे राहिले नाहीत.त्यामुळे आता ते नेते राहिले नाहीत.स्वताच्या स्वर्थासाठी ते शिवसेना सोडुन गेले. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावे. असे खुले आव्हान
शिवसेनेचे आमदार नेते सचिन आहीर यांनी बंडखोर आमदारांना दिले आहे.