वाई ! ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात करावे अन्यथा आंदोलन छेडणार : युवक काँगेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद अनपट

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
वाई शहराच्या मध्य वस्तीत १९९३ पासून  असणार्या  वाईच्या  ग्रामीण रुग्णालया मार्फत सर्व साथींचे आजार डोळ्यांचे ऑपरेशन सिजर बाळंतपण लहाना पासुन मोठ्यांन पर्यंत कोरोनो सह लसीकरण शवविच्छेदन मारामारीच्या मेजर केसेस इसीसी मधुमेह आणी रक्तदाब अशा प्रकारचे  सर्व ऊपचार येथील  डॉक्टर्स परिचारिका सर्व कर्मचारी वर्ग एकत्रीत येऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करत  वाई तालुक्यातील अंदाजे आडीच ते तीन लाख गोरगरीब जनतेचे मोफत ऊपचार आणी ऑपरेशन करुन हे वाईचे ग्रामीण रुग्णालय सेवा करत रुग्ण सेवा हिच इश्वर सेवा मानुन प्रत्येक  रुग्णांचे लाखो रुपये वाचवत २४ तास अखंड सेवा देताना संपूर्ण वाई तालुक्यातील जनता ऊघड्या डोळ्यानी पाहत आहे .येथे मिळत असलेल्या नामांकीत  मोफत सेवेची दखल राज्य सरकारच्या मंत्रालयातील  आरोग्य   मंत्रालयाने घेऊन अखेर ३ वेळा राज्य सरकारने आनंदीबाई जोशी पुरस्कार देऊन वाईच्या ग्रामीण रुग्णालयास गौरवण्यात आले त्याच बरोबर येथील सर्व डॉक्टर्स परिचारिका सर्व कर्मचारी यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली त्या बद्दल शासनाचे आभार .पण अशा नाव लौकिक प्राप्त असलेल्या वाईचे ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर होण्या पासून जाणीव पुर्वक रोखले गेल्याने येथे 
असणार्या अपुर्या सोई सुविधांन मुळे येथे कार्यरत असलेले सर्व  डॉक्टर्स परिचारिका  कर्मचारी यांचे दिवसे दिवस मनोधैर्य खचताना दिसत आहे .अशी ही गौरवशाली परंपरा असलेल्या वाईच्या ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर 
उपजिल्हा रुग्णालयात तातडीने करावे न झाल्यास वाई शहरासह तालुक्यातील विविध सामाजिक  संघटनांचे सहकार्य घेऊन तिव्र स्वरूपाचे आंदोलन ऊभारले जाईल असा इशारा जिल्हाधिकारी सातारा यांना दिलेल्या निवेदनात वाई तालुका युवक कॉग्रसचे तालुका अध्यक्ष प्रमोद  अनपट यांनी दिला आहे .
निवेदनात पुढे म्हटले आहे कि वाई तालुक्यात ११७ गावे असुन येथील भौगोलिक परिस्थिती पाहता बहुतांश गावे हि  दर्या खोर्यानसह पठारावर वसलेली आहेत अशा दुरवरुन गावांन  मधील ग्रामस्थांना पुरेशी दळणवळणाची सोय नसताना देखील ऊपचारा साठी नागरीक औषधे ऊपचारा साठी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात येताना दिसतात तालुक्यातील हजारो वयोवृद्ध नागरीकांचे या ठिकाणी शास्वत डोळ्यांचे ऑपरेशने झालेली आहेत व सदैव ऑपरेशन कॅप चालु असतात डोंगर रांगांन मधील गावांन मधील शेतकर्यांना रात्र अपरात्री  सर्प दंश झाल्यास अशा रुग्णांना देखील येथे आणले जाते येथे शास्वत आणी मोफत औषधे ऊपचार होत असल्याने आणी रुग्ण गमावण्याची भीती नसल्याने हे वाईचे ग्रामीण रुग्णालय सदैव रुग्ण सेवेच्या उंबरठ्यावर ऊभे असते .अंदाजे आडीच ते तीन लाख लोक संख्या असलेल्या वाई तालुक्या साठी  आज पर्यंत एकही उपजिल्हा रुग्णालय  नसावे हे येथील जनतेचे दुर्दैव्य आहे फलटण सारख्या ठिकाणी अपुर्या जागेत उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी होऊ शकते तर वाईच्या ग्रामीण रुग्णालयाची ऐकुन ११ गुंठे जागा स्वताच्या मालकीची वाई शहराच्या मध्य वस्तीत असुन देखील आहे त्या ठिकाणी तीन मजली इमारत ऊभी करुन उपजिल्हा रुग्णालय  होऊ शकते पण दुर्दैवाने राज्य सरकारच्या मंत्रालयातील आरोग्य विभागांची वाई शहरात उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी भावना नसल्यानेच आज पर्यंत उपजिल्हा रुग्णालय वाई शहरात होऊ शकले नसल्याने राज्याचे माजी मुख्यमंत्री आणी माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली  वाई तालुका युवक कॉग्रसचे अध्यक्ष प्रमोद  अनपट यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे 
To Top