पुरंदर ! पिसर्वे येथील २८ वर्षीय युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पिसर्वे : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथील सुभाष राजीव कोलते वय २८ याचा पाण्याचा मोटार चालू करण्यासाठी गेला असता मोटरेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
          आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली यामध्ये सुभाष राजीव कोलते वय २८ या तरुणांचा मृत्यू झाला आहे. सुभाष हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई वडील एक बहीण व पत्नी असा परिवार आहे.
To Top