भोर ! संतोष म्हस्के ! खुनातील मोकाट आरोपीला अटक करा अन्यथा धरणे आंदोलन करणार : भोर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरात मागील २० दिवसांपूर्वी सावञ आईच्या डोक्यात पाटा घालून धारदार शस्ञाने वार करुन हत्या करण्यात आली.या खुनातील आरोपी वीस दिवस होऊन गेले तरी मोकाटच आहे. आरोपीला अटक करण्यात भोर पोलिसांचा हलगर्जीपणा होत असल्यामुळे पोलिसांच्या कामकाजावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली जात आहे.आरोपीला लवकरात लवकर अटक केली नाही तर पोलीस ठाण्याच्या समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
       भोर शहराच्या मध्यवतीॕ ठिकाणावर  वडीलाबरोबर दुसरे लग्न करुन राहत असल्याचा राग मनात धरून आरोपी शिवम अकुंश शिंदे यांने बुधवार  दि. २९  पहाटे ५ च्या सुमारास सावञ आई  रेश्मा अकुंश शिंदे  हिचा धारदार शस्ञाने व दगडाचा पाटा डोक्यात घालून निघ्रुन हत्या केली व आरोपी त्या क्षणी फरार झाला .परंतु या घटनेला २० ते २५ दिवस होत आले तरी आरोपी पकडण्यात भोर पोलिस स्टेशन  अपयशी ठरत आहेत.भोर शहरात ही घटना खळबळ जनक झाली असताना यावेळी वरीष्ठ पोलिस अधीक्षक डाँ. अभिनव देशमुख यांच्या आदेशावरुन भोर पोलिसांनी विषेश पथके आरोपीच्या शोधासाठी पाठवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते. माञ पथके ही फरार आणि आरोपी ही फरार अशी अवस्था झाली आहे. तर आरोपी शोधण्यास पोलिस कमचारी हलगजीॕपणा करत असल्याचे सिद्ध होत आहे.आरोपीला लवकरच ताब्यात घेतले नाही तर  त्यांच्यापासून कुंटूंबाच्या जीवितास धोका आहे. त्यामुळे भोर पोलिसांनी आरोपीची कसून शोध घेऊन ताब्यात घ्यावे अन्यथा भोर पोलिस स्टेशनच्या समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा नातेवाईक व बाजारवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.
To Top