सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने ससून रक्तपेढीच्या साह्याने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ७१ रक्तदात्यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान समजून रक्तदान केले.
भोर येथील अभिजीत मंगल कार्यालय येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवार दि.१७ भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.रक्तदात्यांनी भरभरून शिबिरास प्रतिसाद देत रक्तदान केले.शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे तसेच डॉ. अरुण बुरांडे हस्ते करण्यात आले. शिबिरासाठी भोर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांनी योगदान दिले. यावेळी भोर तालुका निरंकार मंडळातील सर्व ब्रांच व ब्रांच मुखी अभिजीत चिकणे व सेवा दल संचालक शहाजी शिंदे उपस्थित होते