सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जावली : प्रतिनिधी धनंजय गोरे
जावली तालुक्यासह कुडाळ मधे असणाऱ्या कुंभार समाजातील गणपती च्या मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकराना POP च्या मूर्ती तयार करून विक्री करण्यास परवानगी द्यावी या बाबतचे निवेदन जावली चे तहसीलदार राजेंद्र पोळ याना कुडाळचे माजी सरपंच विरेंद्र शिंदे यांनी दिले असून याद्वारे कुंभार समाजाच्या मागण्या शासनाने मान्य करण्याबाबत विनती केली आहे, गणेशोत्सव हा कुंभार समाजाच्या साठी अत्यंत महत्वाचा सण आहे, वर्षभर मूर्ति बनविन्याचे काम चालत असते,शाडू मातीचे वाढते दर, तसेच खराब हवामान व पावसाळ्याच्या दिवसांच्या मुळे मूर्ति सुकन्यास वेळ लागतो, वाढ़ता खर्च यामुळे या मूर्तिच्या किमती देखील जास्त असल्याने सामान्य नागरिकांना खरेदी करने शक्य नाही
कुडाळ बाजारपेठ जावली तालुक्यातील मोठी बाजारपेठ असून गणेशोत्सव काळात मोठी उलाढाल होत असते,कोरोना मुळे गेल्या दोन वर्षात गणेशोत्सव मधे अनेक निर्बंध होते यावर्षी निर्बंध शिथिल झाले तरी शासनाच्या शाडु मूर्ति सक्तीचे धोरण व POP मूर्ति वर असलेली बंदी या मुळे मोठा आर्थिक फटका कुंभार समाजास बसत आहे.मुंबई महानगर पालिकेचे उपायुक्त यांच्या 23 मार्च 2022 च्या पत्रानुसार व नियमावली प्रमाणे शाडू च्या ऐवजी POP च्या मूर्ति वितरणास या वर्षापूर्ती शिथिलता दिली आहे,या पत्रानुसार सातारा जिल्ह्यासह जावली तालुक्यातील कुंभार समाजास देखील POP मूर्ती च्या बाबत वितरण करण्यास परवानगी देण्याची विनंती माजी सरपंच विरेंद्र शिंदे यांनी केली आहे
जावली तहसीलदार राजेंद्र पोळ याना निवेदन देते वेळी सुनील कुंभार, अजय कांबळे, योगेश पवार,अजित शिराळकर,सचिन वारागडे,विजय शेवते उपस्थित होते