भोर ! अनंतराव थोपटे महाविद्यालयात मोफत ऑनलाईन प्रवेश केंद्र सुरू

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेताना परीक्षा फॉर्म भरताना करावी लागणारी धडपड, अतिरिक्त जाणारा वेळ व पैसा यांचा अपव्यय टाळण्यासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अनंतराव थोपटे महाविद्यालय भोर येथे मोफत ऑनलाइन प्रवेश केंद्र सुरू केले गेले आहे. याचे उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत राजगड ज्ञानपीठाचे विश्वस्त गोविंद थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.
      यावेळी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.जी.देशमुख, डॉ.एल. ए.अवघडे व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
     आमदार संग्राम थोपटे अध्यक्षीय भाषणात म्हणाले महाविद्यालयाच्या गुणवत्तेत अधिक वाढ होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. त्यासाठी भविष्यकाळात अधिकाधिक अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त सुविधा पुरवल्या जातील व दर्जेदार उपक्रम राबवले जातील. 
To Top