भले शाब्बास ! सोमेश्वर कारखान्यावरील ऊसतोड कामगारांचा मुलगा झळकला झी मराठीवर : डान्स महाराष्ट्र डान्सच्या फायनल मंच्यावर

Admin
3 minute read

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावरील सद्या एका झोपडी राहणार अकरा वर्षाचा कार्तिक गौतम लोखंडे हा झी मराठी वरील 'डान्स महाराष्ट्र डान्स' या डान्स शोच्या फायनलच्या टॉप बारा मध्ये पोहचला आहे. परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  
         वडील गौतम लोखंडे हे मूळ डोंगरगण जि. बीड येथील असून गेल्या वीस वर्षापासून सोमेश्वर कारखान्यावर ऊस तोडण्याचे काम करतात. सहा महिने ऊस तोडीचे काम  केल्यावर उर्वरित सहा महिने इथेच राहून पडेल ते काम करतात. कार्तिक सद्या सोमेश्वर विद्यालयात ७ वी मध्ये शिकत आहे. सोमेश्वरनगर परिसरातील डान्स चे प्रशिक्षक योगेश ननवरे यांनी चार वर्षापूर्वी ऊसतोडणी कामगारांच्या झोपडीवर बागडणारा हा हिरा अचूक ओळखला. आणि हे प्रशिक्षण कार्तिक च्या आई वडिलांकडे गेले. सुरुवातीला त्यांनी नकार दिला. मात्र नंतर त्यांच्या होकारानंतर गेली चार वर्ष प्रशिक्षण योगेश ननवरे यांनी या हिऱ्याला पैलू पाडत घडवले. 
          सोमेश्वर कारखान्यावर ऊस तोडण्याचे काम करणाऱ्या ऊसतोडणी कामगारांचा मुलगा झी मराठीच्या मंच्यावर पोहोचल्याने परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.
---------------------------
योगेश ननवरे : प्रशिक्षण
कार्तिक गौतम लोखंडे सोमेश्वरमध्ये उसतोडण्यासाठी आलेल्या उसतोड कामगाराचा मुलगा पाच वर्षापुर्वी मला चार मारतांने दिसला. त्या मुलाकडे बघुन मला त्याला डान्स शिकवण्याची इच्छा झाली . त्याच्या घरच्यांनी डान्स करण्यासाठी शिकण्यासाठी नकार दिला. पण मि जीद्द सोडली नाहि. मी दररोज घरी जात त्याला बोलावत जीथे जागा सापडल तीथे प्रॅक्टिस करुन घेत असा आमचा दिनक्रम ४ वर्ष चालु होता. कोव्हिड लॉकडावुन अशा अनेक संकटाना मी तोंड देत होतो. लोकांचा विरोध टोमणे हे सगळं सहन करत . त्याला घडवण्यासाठी राञदिवस मेहनत घेत होतो. माझा २४ तासापैकी  10 तास मी कार्तिकला शिकवण्यासाठी वेळ देत होतो. मनात एकच जिद्द होती. एक दिवस की ह्याला मी टि.व्हि शो ला घेवुन जाणारच. आणि लोकांना टिव्हिवर दाखवणार आणि आज तो zee मराठी या डान्स शो मध्ये २७ तारखेपासुन येत आहे. एकही रुपया फि न घेता स्वताचे मी पैसे त्याच्यासाठी खर्च करुन त्याला शिकवले बाहेर स्पर्धेल घेवुन जात असे. कोणालाहि मदत न मांगता माझा छोटा भाऊ समजुन मी त्याला मनापासुन शिकवत होतो. आणि आज मी बघीतलेल स्वप्न पुर्ण झाले. ह्याचा मला मनापासुन खुप आनंद आहे.
To Top