बारामती ! वाणेवाडी ग्रामपंचायत बस 'नाम' ही काफी है !! ..काय ती ग्रामपंचायत... काय ती बॉडी...काय ते ठेकेदार.. ओकेच समद्य

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ग्रामपंचायती अंतर्गत होणारे विकासकामांचे ठराव न करता जो ठेकेदार जास्त  टक्केवारी देतो त्यालाच दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून यामुळे गावातील विकासकामे निकृष्ट होत आहेत.
            ग्रामपंचायत कामाचे मूल्यांकन उपलब्ध  नसून ग्रामपंचायतीने मागील अडिच वर्षात ग्रामसभा घेतली नाही. ऑनलाईन टेंडरची मुदत १५ दिवस असतानाही  पदाधिकारी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून ५ दिवसांतच टेंडर बंद करत आहेत. मर्जीतील ठेकेदार आणि पदाधिकाऱ्यांची मीलीभगत गाव विकासाला अडथळा ठरत असल्याने एकेकाळी जिल्ह्यात क्रमांक एकवर असलेली वाणेवाडी ग्रामपंचायत सध्या बॅकफूटवर गेली आहे. 
          याचा परीणाम गेली २५ वर्षे बिनविरोध होणाऱ्या निवडणूकीवर होणार असून ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत युवकांनी  ग्रामपंचायत लढवण्याचा निर्धार केला आहे. दोनच दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने मासिक बैठक आयोजित केली होती मात्र सरपंचानींच या बैठकीला दांडी मारली. मागील कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टीची वसूली केली नसल्याने लाखो रुपयांची थकबाकी वसूल झालेली नाही. गावात बसवलेले बहुतांश हायमास्ट दिवे बंद आहेत. ग्रामपंचायत पदाधिकारी घरकुल मंजुरीसाठी पैसे घेत आहेत. मात्र पैसे घेऊनही घरकुल मंजूर होत नाही. पैसे देण्यासंदर्भात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने सोमेश्वरनगर परीसरात एकच खळबळ उडाली आहे. बारामतीचे गटविकास अधिकारी यांनी स्वतः याबाबत चौकशी करावी अशी मागणी माजी सरपंच दिग्विजय जगताप यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी मिळूनही दर्जेदार विकासकामे होत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
------------------------
 गावातील ठेके घेण्यासाठी विना परवाना धारक
 कोणत्याही प्रकारचा अनुभव कौशल्य नसलेल्या युवकांचा गावातील ठेके घेण्यासाठी सुळसुळाट झाला आहे. यामुळे गावातील कामे निकृष्ट दर्जाची होत असून गाव पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. 
To Top