सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे करंजेपुल वाणेवाडी रस्त्यावर अवैद्यरित्या सुरू असलेल्या ऑनलाइन चक्री धंद्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी कारवाई करत
चौघांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोमेश्वरनगर येथील कारखाना रस्त्यावर एका ठिकाणी अवैद्यरित्या ऑनलाइन चक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलिसांना समजल्यावर सपोनी सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी छापा टाकत पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत एक कॉम्प्युटर, खेळण्याचे साहित्य, वही पेन व रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.