बारामती ! शारदानगर येथे संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील दुसरे उभे रिंगण संपन्न

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पालखी सोहळा प्रतिनिधी : रोहित जगताप
सोमेश्वरनगर येथील गोल रिंगण पार पडल्यानंतर आज माळेगाव येथील शारदानगर येथे या पालखी सोहळयातील दुसरे उभे रिंगण पार पडले. 
           सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याच्या आश्वांचे शारदानगर येथे उभे रिंगण हरीनामाचा जयघोषात भक्तिमत वातावरणात पार पडले केला. या भक्ती सोहळ्यासाठी संबंध आध्यात्मीक क्षेत्रातील भक्तीसागर उसळला होता. त्यामुळे या ठिकाणचे वातावरण हरीनामाने दुमदुमले होते. या आश्वाच्या पायाखालची माती आपल्या भाळी लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली व या भक्तीमय क्षणी हरीनामाचा गजर केला.


व शेवटी उशीरा संत सोपानदेव महाराजांची पालखी बारामती मुक्कामाकडे मार्गस्थ झाली. बारामती नगरपालिकेने पालख्याची स्वागताची जय्यत तयारी  केली होती. यावेळी नगरपालिकेच्यावतीने वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले
To Top