मोरगाव ! एचपी गॅस वितरकांकडून ग्राहकांची लूट : कंपनीच्या विक्री अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मोरगाव ! प्रतिनिधी
         बारामती तालुक्यातील अनेक गावात एचपी कंपनीचे गॅस धारकांची संख्या मोठी आहे. मात्र: या गॅसधारकांना कंपनीच्या मनमानी कारभारामुळे आर्थिक फटका सहन करावा लागतो. गॅस कंपनीच्या मुख्य डीलर कडून गावागावात नेमणूक केलेले पॉईंट धारक हे आगाऊ पैसे घेऊन फसवणूक करत असल्याची तक्रार आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कंपनीचे विक्री अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.
           मोरगाव येथे जेजुरी येथील एका नामांकित एचपी गॅस डीलरचा पॉईंट आहे. या ठिकाणी स्थानिक ग्राहकांची सोय करण्याचे हेतूने गॅसचे सिलेंडर ठेवले जातात. येथून सिलेंडर देताना सर्वसाधारण दहा ते वीस रुपये मेहनताना म्हणून घ्यावे असे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्ष 50 ते 60 रुपये ज्यादा पैसे घेऊन हे सिलेंडर दिले जातात.
         याबाबत संबंधित एजन्सी मालकांकडे अनेक वेळा तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने हे या गैरप्रकारचे समर्थन करत आहेत का ? असा सवाल उपस्थित होतो. पुरंदर तहसील कार्यालयाचा पुरवठा विभाग याबाबत निद्रिस्त आहे. 
--------------
सर्विस पॉईंट च्या ठिकाणी सिलेंडर ठेवण्याची मर्यादा व सुरक्षेचे काय ?
 पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुख्य गॅस डीलर कडून गावागावात गॅस वितरणाचे पॉईंट निर्माण करण्यात आले आहेत. या ठिकाणी दहा ते वीस भरलेले सिलेंडर ठेवले जातात येथे कुठल्याही स्वरूपाची अग्निशामक प्रतिबंधक उपाययोजना अथवा सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम यंत्रणा नाही. आपत्कालीन परिस्थितीत कुठलीही दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण व सुरक्षेचे काय ? हा प्रश्न नव्याने उपस्थित झाला आहे.
           एचपी कंपनीकडून ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी नेमण्यात आलेले कंपनीचे सेल्स ऑफिसर अपेक्षित दखल घेत नाहीत. दर महिन्याला मोरगाव परिसरात एचपी गॅस धारकांची हजारो रुपयांची आर्थिक लूट होत असल्याने याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. याबाबत योग्य दखल न घेतल्यास संबंधित घरगुती गॅसचे लाभार्थी हे ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करणार आहेत.
To Top