भोर ! खानापूरला विठु नामाच्या गजरात दंगले भाविक- भक्त : देवाचे पालखीतून वाजत गाजत स्वागत

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त रविवार दि-१० भोर तालुक्याच्या वीसगाव खोऱ्यातील खानापूर (थोपटेवाडी)येथील महिला व पुरुष भाविक भक्तांनी विठू नामाचा गजर करीत गावातून दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात काढला.
      रविवारी सकाळी विठ्ठल -रुक्मिणी मंदिरातील  धार्मिक विधी उरकून वीना,टाळ, मृदुंग च्या गजरात पालखीतून ग्रंथ दिंडीचे प्रस्थान गावात करण्यात आले.पालखी सोहळ्यात ज्येष्ठ नागरिक, पुरुष, महिला, लहान मुले मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. वारकऱ्यांनी गावातील चौका चौकात रिंगण करीत ज्ञानोबा माऊली तुकाराम तसेच विठू नामाचा गजर केला तर चिमुकल्या माऊलींनी व महिलांनी फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला.दिंडीमुळे पूर्णता गावात भक्तीमय वातावरण झाले होते.यावेळी पंढरीनाथ थोपटे, सुभाष कोंढाळकर, नथू थोपटे, मृदुंग वादक शिवाजी नांगरे,अजित थोपटे,अनिल थोपटे,दत्तात्रय थोपटे,अनिल थोपटे,सुरेश थोपटे,शिला थोपटे, सुरेखा थोपटे, ताराबाई कोंढाळकर ,सुवर्णा थोपटे, सविता थोपटे आदींसह शेकडो भाविक भक्त उपस्थित होते.

To Top