पुरंदर ! गुळूंचे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी संगीता नेवशे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
निरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील गुळूंचे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी संगीता शांताराम नेवसे यांची  बिनविरोध निवड करण्यात आली. 
       मावळते उपसरपंच संतोष भगवानराव निगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्तपदी ही निवड करण्यात आली. पुरंदर पंचायत समितीचे मा.सभापती .अजित निगडे यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी सरपंच संतोष निगडे माजी.सरपंच संभाजी कुंभार , अभय निगडे , निलेश निगडे, दिपक निगडे , तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी निगडे, सदस्य शितल निगडे ,सदस्य चंदाताई निगडे ,सदस्य पाटोळे ताई ,भैरवनाथ वि.का. चेअरमन मल्हारी निगडे , रामदास बुवा निगडे , तानाजी काका निगडे  , शांताराम नेवसे  व नेवसे वाडीतील ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. 
To Top