सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर शहरात मागील २० दिवसांपूर्वी सावञ आईच्या डोक्यात पाटा घालून धारदार शस्ञाने वार करुन हत्या करण्यात आली होती.या खुनातील मोकाट फिरणाऱ्या आरोपीला अखेर वीस दिवसांनी भोर पोलिसांनी दिल्ली येथे गुरुवार दि.२१ शिताफीने जेरबंद केले.
भोर शहराच्या मध्यवतीॕ ठिकाणावर वडीलाबरोबर दुसरे लग्न करुन राहत असल्याचा राग मनात धरून आरोपी शिवम अकुंश शिंदे वय -२२ यांने बुधवार दि. २९ पहाटे ५ च्या सुमारास सावञ आई रेश्मा अकुंश शिंदे हिचा धारदार शस्ञाने व दगडाचा पाटा डोक्यात घालून निघ्रुन हत्या केली होती.आरोपी तत्काळ फरार होऊन गेले २० दिवसांपासून कर्नाटक,कन्याकुमारी,ओरिसा, दिल्ली अशा ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यात फिरून भोर पोलिसांना गुंगारा देत होता.मात्र जिल्हा ग्रामीण अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते तसेच उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भोर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे व विशेष पथक पोलीस हवालदार विकास लगस,पोलीस नायक अजय साळुंके यांनी दिल्ली येथे कारवाई करून आरोपीस अटक केली.