आख्खी शिवसेना फुटली....पण बारामती तालुक्यातील 'हा' कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत....!

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
गेल्या महिन्याभरात आपण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चाललेल्या घडामोडी पाहत असतानाच जवळपास ७० टक्केच्या वर शिवसेनेतील पदाधिकारी शिंदे गटात सामील झाल्याचे आपण पाहत आहोत..असे असले तरी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मानणारे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्या वाईट काळात त्यांच्या समवेत ठामपणे उभे आहेत. 
            असाच एक कार्यकर्ता म्हणजे बारामती तालुक्यातील करंजे गावातील राकेश उर्फ बंटी गायकवाड..! वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेमात पडलेल्या या कार्यकर्त्याने आज तागायत शिवसेनेशी एकनिष्ठ राहिला आहे. कुठल्या पदाचे अमिश नाही..ना कुठल्या ठेक्याची हाव नाही..असा हा कार्यकर्ता... राष्ट्रवादी काँग्रेस पक्षमय असलेल्या बारामती तालुक्यात शिवसेनेचे काम करणे तसं सोप्प नव्हते. पण करंजे गावातील सर्वसामान्य घरातील..स्वतःचा किराणा माल चा व्यवसाय सांभाळत राकेश गायकवाड यांनी करून दाखवलं आहे. २० वर्षांच्या कालावधीनंतर त्यांना बारामती तालुका पश्चिम विभाग प्रमुख हे पद मिळाले आहे.
       याबाबत राकेश गायकवाड यांनी 'सोमेश्वर रिपोर्टर'शी बोलताना सांगितले, आज महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थती शिवसेनेच्या काहीं गद्दार नेत्यांनी शिवसेनेविरोधात बंड करून निर्माण केली आहे ते संपुर्ण महाराष्ट्र पाहतोय , याआधीही शिवसेनेत बंड झाली बरीचशी नेते मंडळी बाहेर पडली , परंतु या सर्व नेत्यांनी कधीही शिवसेना म्हणजे मी किंवा शिवसेना माझी असा नीच विचार केले नाहीं आणि ते कधीही करणारेही नव्हते, कारणं ही तसच आहे जो शिवसेना पक्षात राहतो , बाळासाहेबांचे विचार जोपासतो तोच खरा शिवसैनिक असतो आणि तो संघटनेतून बाहेर जरी पडला तरी शिवसेना पक्षावरील त्याच असणारं प्रेम कधीही कमी होत नाही , यालाच म्हणतात  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक , परंतु गेल्या चार दिवसांपूर्वी सेनेची काहीं नेते मंडळी बाहेर पडली आणि आज तीच लोकं शिवसेना माझी आणि बाळासाहेब ठाकरे आमचे असं सांगत आहेत , म्हणजे यातुन सर्वसामान्य शिवसैनिक यास असं जाणवतं की या गद्दार शिवसेना बंडखोर आमदार,मंत्री यांनी काहींनी २० काहींनी ३० वर्ष सेनेत यासाठीच काढली असावीत की भविष्यात सेनेवर आपला कब्जा घेता येईल म्हणून , परंतु मला एक कळत नाही की माणूस एव्हढा खालच्या पातळीवर जाऊन कसा काय विचार करत असेल , शिवसेना ही  मा बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली मग याच्यावर  मुलगा म्हणून किंवा मा. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मा. उद्धव ठाकरे साहेब यांचाच अधिकार आहे , मग आज बंडखोरी करून गद्दारी करून आज काहीं लोकं आपला बाप बदलण्यापर्यंत येऊन ठेपली आहेत ,आज गद्दार लोकं म्हणतात की शिवसेना आमची आणि बाळासाहेब ठाकरे तेही आमचेच , मला वाटतं महाराष्ट्रात बाप बदलण्याची परंपरा नाहीं , परंतु राजकारणाची पातळी इतकी खाली आली आहे की आज लोकं दुसऱ्याच्या बापालाही आपलाच बाप म्हणत आहेत ,जनता एवढी दुधखुळी नाहीं आहे येत्या काळात जे लोकं दुसऱ्याच्या बापालाही आपलाच म्हणत आहेत जनता या लोकांना त्यांच्या खऱ्या बापाची आठवण करून दिल्या शिवाय राहणार नाही ....
To Top