बारामती ! बीटस्तरीय वकृत्व स्पर्धेत सई भापकर हिचे नेत्रदीपक यश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचायत समिती बारामती यांच्या वतीने आयोजित वानेवाडी बीटस्तरीय स्पर्धेतजिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजेपूल या शाळेतील सई सुधीर भापकर हिने वकृत्व स्पर्धेत व वेशभूषा स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवीत प्रथम क्रमांक पटकावला. 
        यावेळी करंजेपूल शाळेतील पूर्वा अभय भापकर हिने चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक व अधिराज राहुल पवार याने निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला असून या सर्व विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख ओमासे साहेब, मुख्याध्यापिका श्रीमती उषा जाधव, वर्गशिक्षक येवले सर सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी तसेच ग्रामपंचायत करंजेपूल यांनी हार्दिक अभिनंदन केले.
To Top