सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने सालाबादप्रमाणे कुतवळवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, लक्ष्मीकांत(भाऊसाहेब) भोसले यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुतवळवाडी याठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, शालेय साहित्य,खाऊ वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला,
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे माजी सभापती शौकत कोतवाल ,ग्रामपंचायत सरपंच शिवाजी सकट ,शाळा व्यवस्थापन समितीचे आजी-माजी अध्यक्ष ,ग्रामपंचायत चे आजी-माजी सदस्य ग्रामस्थ आणि तरुण मित्र उपस्थित होते.