सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
आठ दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सुचनेनुसार जानाई उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आली असुन या योजनेतून बाबुर्डी गावातील तीन तलाव सुरूवातीला भरून देण्याची विनंती बाबुर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी अजित पवार यांच्या कडे केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी जानाई योजनेच्या संबंधित अधिकारी वर्गाला बाबुर्डी गावातील तलावात प्रथम पाणी देण्याची सुचना केली आणी योजना सुरू होताच सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी केलेल्या मागणीनुसार बाबुर्डी गावातील तलावात पाणी देण्यात आले होते आज रोजी या योजनेतून लव्हेमळा तलाव, गायकवाडमळा तलाव, ढोपरेमळा तलाव हे तिन्हीं तलाव पुर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत या पाण्यामुळे येथील शेतकरी वर्ग सुखावला असुन पुढील तीन महीने पाण्याची कमतरता यामुळे जाणवणार नसुन याठिकाणी ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असुन त्याबरोबर बाजरी तसेच अनेक शेतकरी तरकारी पिक मोठ्या प्रमाणात करतात या जानाई योजनेच्या पाण्यामुळे येथील शेतकरी वर्गाचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे या जानाई योजनेचे अधिकारी हे अतिशय प्रामाणिकपणे आपलं काम करतात तसेच शेतकरी वर्गासी योग्य असी सल्लामसलत करून पाण्याचे योग्य अस नियोजन करतात असी माहीती यावेळी येथील शेतकरी महेश ढोपरे, रामदास गायकवाड, राजकुमार लव्हे यांनी दिली