या पोरांचे प्रकल्पच भारी.....! सोमेश्वरनगर येथील राज्यस्तरीय 'सोमेश्वर टेक्नोथॉन' मध्ये दिसले देशाचे भावी संशोधक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
ॲड .गणेश आळंदीकर 
 राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वाढदिवसानिमित्त सोमेश्वर सहकारी साखर कारखाना संचलित सोमेश्वर इंजिनिअरींग कॉलेज मधे गेल्या दोन दिवसात लहान मुलापासुन इंजिनिअरींग पर्यंत शिक्षण घेत असलेल्या भावी संशोधकानी हजेरी लावली अन या मांदीयाळीत लक्षवेधी प्रकल्प पुढे येताना दिसले .
                ग्लोबल वार्मींग ,सुरक्षा रक्षक कवचे पासुन औद्योगिक क्रांती तील बदल ,कॉंप्युटर क्षेत्रातील नवनवीन बदल ,ट्रेकिंग ला वापरण्यात येणाऱ्या गाड्या ,सौर उर्जेपासुन मोबाईल चार्जींग सिस्टीम ,सेंसॉर द्वारे सॅनिटायझर स्प्रे ,तिजोरी कपाटे याना लेझर सिस्टीम द्वारे सुरक्षा ,पाण्याच्या टाक्या भरल्या तर अलार्म वाजुन सुचना ,मशरुम चे प्रकार विषारी मशरुम व आरोग्यास गरजेचे मशरुम ,आपल्या सभोवताली असलेल्या वनौषधी ,टाळी वाजताच लागणारा बल्ब ,एकाच उपकरणावर संचलीत होणाऱ्या स्ट्रीट लाईट ,अंध व्यक्तीना हातात एक उपकरण घालुन फिरताना समोर कागद जरी आला तरी जोरात भोंगा वाजणारा प्रकल्प ,कमी विजेच्या वापरातील पंखे असोत अथवा कमी खर्चात नारळ खिसणारी मशीन असो अथवा ॲग्रीकल्चर च्या विद्यार्थ्यानी फक्त शेती उपयोगी बनवलेली ऑनलाईन खरेदी साठीची वेबसाईट असो सर्वच उपक्रम लक्षवेधी ठरले. सोमेश्वरनगर माळेगाव,बारामती पासुन  अकलुज ,यवतमाळ,काष्टी ,राहुरी अशा राज्यातील अनेक ठिकाणाहुन या टेक्नोथॉन साठी पाचवी पासुन ते ईंजिनिअरींग पर्यंत विद्यार्थी आले .
      बुधवारी सकाळ पासुन बारावी पर्यंत च्या विद्यार्थ्यानी प्रकल्प सादर केले .ओमराज भारत खोमणे या मुलाने कॉंप्युटर मधे प्रोग्राम करुनसेंसॉर द्वारे  तापमान दर्शवणारा प्रकल्प केला.सिद्धी नरुटे ,सृष्टी पवार यानी टाकाऊ वस्तु पासुन अगदी कमी किमतीत एका भिंगाच्या खर्चातला प्लास्टोस्कोप तयार केला बारावी शास्त्र च्या धनराज दिपक आळंदीकर याने सेंसॉर वर सॅनिटायझर स्प्रे तसेच पानी वाया जावु नये म्हणून टाकीतील  पाण्याच्या लेवल नुसार वाजणारा भोंगा ,व लेझर अथवा हात मधी आला तरी वाजणारा भोंगा ...तिजोरी कपाट अथवा दाराना सेंसॉर लावुन सुरक्षिततेसाठी चा प्रकल्प  असे तीन  प्रकल्प तयार केले. ग्लोबल वार्मींग मुळे होणारे नुकसान व पर्याय दर्शवणारा वैष्णवी संकपाळ,सुदर्शन पवार व प्राची संकपाळ यांचा प्रकल्प ,आर्यन नरुटे यानी शेती वर औषध फवारणी करणारे यंत्र ,पेरणी यंत्र असे अनेक प्रकल्प सादर केले .
     गुरुवारी वरिष्ठ व इंजिनिअरींग च्या विद्यार्थ्यानी जे प्रकल्प केले त्यामधे परिक्रमा इंजिनिअरींग कॉलेज काष्टी च्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प आकर्षक ठरले . त्यांच्या एका प्रकल्पात मोबाईल चोरीला गेल्यावर तो बंदच होणार नाही अशी रचना असलेला प्रोग्राम विद्यार्थ्यानी तयार केला त्याचा मोठा फायदा भविष्यात होऊ शकतो . याच कॉलेज च्या विद्यार्थ्यानी औद्योगिक क्रांती तील बदल कोळशा वरुन चालणाऱ्या रेल्वे इंजिनपासुन बुलेट ट्रेन पर्यंत चे बदल औद्योगिक विश्व ४ असा सुंदर प्रकल्प करुन त्यात वर्तमानातील गरजा ,आव्हाने व त्यावर उपाययोजना बाबत माहीती सांगीतली .तसेच अंध व्यक्ती जर चालत असेल तर त्याच्या हाताला एक उपकरण बसवुन त्याला समोर कागद आला तरी भोंग्याचा आवाज होणार असा प्रकल्प व संशोधन केले . यवतमाळ च्या विद्यार्थ्यानी एक अशी वेबसाईट बनवली ज्यामधे ऑनलाईन खरेदी करताना ज्या भागात शेती जशी आहे तिथे त्या ठिकाणी जिथे औषधे उपलब्ध असतील त्याची माहीती असेल एक वेगळा व सुंदर प्रकल्प त्यानी केला याशिवाय टाळी वाजताच बल्ब लागणार तसेच दरवाजा उघडताना एक कार्ड लावुन अथवा चेहरा समोर धरुन तो उघडणारा प्रकल्प असे नानाविध प्रकल्प या मुलानी सादर केले अक्षरशः भावी संशोधकांची मांदीयाळीच दोन दिवस सोमेश्वरनगर ला गोळा झाली होती सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर व सर्व संचालकानी तसेच सोमेश्वर इंजिनिअरींग कॉलेज चे प्राचार्य व शिक्षक व सचीव आदीनी नियोजनबद्ध हे सोमेश्वर टेक्नोथॉन पार पाडले .
To Top