सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
व्याजाच्या पैशातून झालेल्या वादातून एकाचा धारधार शास्त्राने वार करत खून केल्याची घटना बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथे घडली आहे.
याबाबत मयताचा भाऊ अविनाश सुरेश गाडेकर, वय. २९ रा. मासाळवस्ती सोरटेवाडी ता. बारामती याने दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी अमोल वसंत माने व सागर वसंत माने दोन्ही रा. सोरटेवाडी ता. बारामती जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मयत रोहित सुरेश गाडेकर याने आरोपी अमोल वसंत माने रा. सोरटेवाडी ता. बारामती जि.पुणे यास काही दिवसापुर्वी व्यजाने दिलेले १५ लाख रूपये परत देतो असे म्हणुन यातील दोन्ही आरोपींनी मयत रोहित सुरेश गाडेकर यास सोरटवाडी गावच्या हददीतील असलेल्या गोरख खेंद्रे याचे पोल्टीजवळ कुलकर्णी चारी ते शेंडकरवाडी रोडच्या लहान पुलावर बोलावुन घेवुन जिवे मारण्याचे उददेशाने त्याचे चेहऱ्यावर, तोंडावर, मानेवर, हातावर धारदार शस्त्राचे वार करून त्यास जिवे ठार मारुन त्याचा खुन करुन तेथुन निघुन गेले आहेत. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे उसपोनि राहुल साबळे करत आहेत.