वाई ! दौलतराव पिसाळ ! दरोड्यातील फरारी आरोपीच्या आवळल्या मुसक्या : भुईंज पोलिसांची दमदार कामगिरी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ
भुईंजमधील दुचाकी चोरीही उघडकीस : आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
 पुणे जिल्ह्यातील दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीस भुईंज पोलिसांनी साफळा रचून अटक केली आहे. याच आरोपीकडून एक वर्षापूर्वी भुईंजमधून चोरी झालेली दुचाकीही हस्तगत केली असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी, की पुणे पोलिसांच्या वाँटेड यादीवर असणारा आणि पुण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल असणारा आरोपी बाळासाहेब गायकवाड (रा. बावधन, ता. वाई) हा पाचवड येथे येणार असल्याची खबर खबर्‍यामार्फत भुईंज पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपाधिक्षक डॉ. शितल जानवे खराडे, सपोनि आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार व्ही. एस. अवघडे, एस. व्ही. बल्लाळ, आर. एम. वर्णेकर, पी. डी. शिंदे यांनी साफळा रचून बावधन येथील बाळासाहेब गायकवाड याला पाचवड येथून अटक केली. यावेळी त्याच्याकडून भुईंज येथून कुमार प्रकाश तांबोळी यांची गेल्यावर्षी चोरीला गेलेली दुचाकीही हस्तगत केली. सदरचा आरोपी पुणे जिल्ह्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांना वाँटेड असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. भुईंज पोलिसांच्या या कारवाईबद्दल परिसरात समाधान व्यक्‍त होत असून गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन होत आहे.
To Top