सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
पश्चिम भागातील प्राथमीक आणि माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक यांनी गेल्या चार पाच दिवसा पासून पडत असलेला मुसळधार पाऊस तो थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे हायस्कूलचे विद्यार्थी लवकर सोडावेत
व ते विद्यार्थी वाऱ्यावर न सोडता ते पालकांच्या
ताब्यात देण्याची जबाबदारी स्थानीक शालेय व्यवस्थापन समीतीने स्विकारने गरजेचे आहे व तसा अहवाल तयार करुन गटविकासअधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या कडे पाठवुन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे असे आवाहन वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी गावो गावी दि.१५ रोजी मुसळधार पाऊसात घातलेल्या बैठकांन मध्ये केले आहे .
सविस्तर वृत्त असे वाई तालुक्यासह पश्चिम भागातील गावा गावांन मध्ये गेल्या आठवडाभरा पासुन मुसळधार पाऊस पडत आहे .पडलेल्या पावसाचे पाणी हे जमीनीत मुरत आहे तर काही गावांन मधील ओढे नाले धोक्याची पाणी पातळी ओलांडुन तुडूंब भरुन वाहताना दिसत आहेत .तर काही ठिकाणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने गावा गावातील शालेय विद्यार्थी नागरीक व त्यांची असलेली पाळीव जनावरे आणी राहती घरे गुरांचा गोठे अथवा छप्पर यांची सुरक्षितता धोक्यात येवु नये या साठी वाईचे कार्यतत्पर असलेले तहसीलदार रणजित भोसले व वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप या दोन्ही तालुकास्तरीय जबाबदार अधिकारी वर्गाने एकत्रीत येऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशा वरुन आणी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या मार्गदर्शना खाली वाईच्या पश्चिम भागातील एकसर दसवडी बोरगाव दह्याट वयगाव बलकवडी नांदगणे परतवडी कोंढवली वासोळे कोंढावळे वाशीवली जांभळी या गावांना शुक्रवार दि.१५ रोजी पडत असलेल्या मुसळधार पाऊसात जाऊन वरील गावांन मध्ये बैठकांचे आयोजन करुन गावातील प्राथमीक माध्यमीक शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक
सर्कल ऑफिसर तलाठी ग्रामसेवक आणी गाव कारभारी ग्रामस्थ यांना बैठकीला बोलावून त्यात ऊपस्थितांना मार्गदर्शन करताना तहसीलदार रणजित भोसले म्हणाले गेल्या आठवडा भरा पासुन पश्चिम भागातील गावांन
मध्ये पडत असलेला मुसळधार पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही अशा वेळी खबरदारीचा ऊपाय म्हणुन प्रत्येक शाळेत भर पावसात ओढे नाले यांना आलेल्या पावसाच्या पाण्यातुन विद्यार्थी शालेय शिक्षण घेण्यासाठी
येताना दिसत आहेत शाळा सुटल्यावर प्रत्येक विद्यार्थ्यी हा सुखरूप घरी पोहचण्या साठी तातडीने पालकांची बैठक घेऊन त्यात प्रत्येक पालकाने आप आपला विद्यार्थी घराकडे नेहण्या साठी शाळेत येण्याची सक्ती करावी त्याच बरोबर प्रत्येक विद्यार्थ्यी हा घरी पोहचला
कि नाही याची जबाबदारी आणी खबरदारी प्रत्येक शाळांचे मुख्याध्यापक आणी शिक्षकांनी घेतलीच पाहिजे विद्यार्थी हि देशाची शक्ती आहे ती जपणे हि प्रत्येक शाळांन मधील शालेय व्यवस्थापन समिती बरोबरच मुख्यध्यापक आणी शिक्षकांची आहे ती अतिवृष्टीच्या काळात जबाबदारीने पार पाडावी
असे आवाहन तहसीलदार रणजित भोसले यांनी केले आहे .
त्याच बरोबर गेल्या वर्षी सारखे दुःखाचे डोंगर पुन्हा आपल्या नशिबात येऊ नये म्हणून ग्रामस्थांनी तुडूंब भरुन वाहत असलेल्या ओढ्या नाल्यातुन आपली जनावरे अथवा भांडी व कपडे धुवायला जाऊ नये याची खबरदारी सर्वच ग्रामस्थांनी स्वताची व कुटुंबाची काळजी स्वताच घेणे गरजेचे आहे डोंगर अथवा दर्या खोर्यात चरण्या साठी जनावरे घेऊन ग्रामस्थांनी जाऊ नये होत असलेल्या अतिवृष्टीचे पाणी जमिनीत मुरताना
दिसत आहे या मुळे धोकादायक डोंगर कडे ढासळण्याची दाट शक्यता आहे .डोंगर ऊतारा वर घरे छप्पर असणार्यांनी रात्रीच्या विश्रांती साठी सुरक्षित ठिकाणी गेले तर फारच सोईस्कर होईल . प्रशासनाला ज्या ज्या राहत्या घरांना धोका आहे असे वाटेल त्या घरातील नागरीकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल. पश्चिम भागातील कुठल्याही गावात दुर्घटना घडु नये आणी त्याच्यातुन जिवीत अथवा इतर हानी
होऊ नये म्हणून वाई प्रशासनाची ही धडपड सुरू आहे .ज्यांची घरे किंवा भिंती पडुन नुकसान झाले असेल अशांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मंडलाधिकारी आणी तलाठ्यांना दिले आहेत. अशी माहिती वरील गावांन मध्ये झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत कार्यतप्तर असलेले वाईचे तहसीलदार रणजित भोसले आणी वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायणराव घोलप यांनी दिली. या वेळी मुसळधार पाऊसात आलेले तहसीलदार आणी बिडीओ यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले .
या बैठकांन साठी वरील गावांनचे सरपंच ऊप सरपंच सदस्य चेअरमन आणी पसरणी विभागाचे मंडलाधिकारी राजेंद्र बेलोशे धुम विभागाचे मंडलाधिकारी सौ.लतीका कोरडे तलाठी संतोष जगताप विना पुंडे अमोल कुंभार सचिन वडगुले .ग्रामसेवक रुपाली पावडे अशोक जंगले बाळासाहेब भोसले प्रवीण राऊत विठ्ठल संकपाळ निर्मला थोरवे साहेबराव तळपाडे अशोक पवार रमेश निगडे महेश देशमुख या गाव प्रमुख अधिकारी वर्गांची ऊपस्थिती होती