सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सुप्रसिद्ध सुवर्ण पेढी, " पुनम ज्वेलर्स, के. एम. आळंदीकर सराफ या संस्थेला लंडन स्थित पॅरामाउंट क्वालिटी सर्टिफिकेशन या संस्थेचे ISO 9001: 2015 हे प्रमाणपत्र सोने-चांदी अलंकाराच्या निर्मिती व व्यापारासाठी प्रदान करण्यात आले आहे.
ISO चा लॉंगफॉर्म इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फोर स्टॅंडर्डायजेशन असा आहे. हे एक प्रकारचे क्वालिटी स्टॅंडर्ड सर्टिफिकेट आहे जे उद्योग, संस्था किंवा व्यवसायासाठी दिले जाते. आजच्या काळात जगभरात १८० पेक्षा जास्त देशांमधील १० लाखांपेक्षा जास्त संस्थांना हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
एखाद्या संस्थेची गुणवत्ता, शुद्धता,प्रॉडक्ट कवालिटी, ग्राहकांचे समाधान व त्या संस्थेचे व्यवस्थापन कौशल्य या सर्वांची तपासणी करुन हे प्रमाणपत्र दिले जाते. ह्या प्रमाणपत्राच्या परिणामस्वरुप त्या संस्थेची बाजारातील विश्वसनीयता दर्शवीते.