सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

'सोमेश्वर'च्या येणाऱ्या गळीत हंगामात ४२ हजार एकरातील तब्बल १५ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध ! पुरुषोत्तम जगताप

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याने मागील गाळप हंगामात १३ लाख २५ हजार ३९५ मे. टन ऊसाचे गाळप केले असुन यातुन बी हेव्हीसह सरासरी ११.९९ टक्केचा साखर उतारा राखत १५ लाख ५४ हजार ६२५ साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. सोबत कारखान्याच्या कोजन प्रकल्पामधुन ११ कोटी ३७ लाख ५४ हजार ९६९ युनिट्स वीजनिर्मिती केली असुन ७ कोटी २२ लाख २४ हजार ५०८ युनिट्सची वीजविक्री केलेली आहे. कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून १ कोटी ११ लाख ५० हजार लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असुन ४८ लाख ९५ हजार ८३२ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले असल्याची माहिती सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.  

            सोमेश्वर कारखान्याचा रोलर पुजन समारंभ गुरुवार(दि.१४) रोजी कारखान्याचे संचालक शांताराम कापरे व किसन तांबे यांच्या हस्ते व अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी जगताप बोलत होते.  यावेळी संचालक राजवर्धन शिंदे, सुनिल भगत, ऋषीकेश गायकवाड,  प्रविण कांबळे, लक्ष्मण गोफणे, कमल पवार, प्रणिता खोमणे, अधिकारी-कामगार उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले की, येणा-या गाळप हंगामासाठी कारखान्यातील अंतर्गत कामे प्रगतीपथावर असुन कारखान्याने केलेल्या विस्तारवाढ प्रकल्पाची यशस्वी चाचणी गत हंगामात पार पडली आहे. येणा-या हंगामासाठी तोडणी वाहतुक यंत्रणेचे करारही सुरु केले असुन आजपर्यंत ९०० बैलगाडी, २५० डंपीग, ५० ट्रक, ३९० ट्रॅक्टर, ९ हार्वेस्टरचे करार पुर्ण झाले असुन तोडणी वाहतुकीसाठी पहिल्या हप्त्याचे वाटप १५ जुलैपासुन करणार आहोत.

             कारखान्याने गत हंगामात ऊसबीलापोटी  २० हजार १२३ ऊस पुरवठादार शेतक-यांच्या खात्यावर प्रति मे.टन २८६७ रुपयाप्रमाणे प्रमाणे ३८० कोटी रुपये वर्ग केले असल्याचे जगताप म्हणाले. कामगारांचे पगार वेळेत करीत असुन गतवर्षी केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल कारखान्याचे सर्व कायम व रोजंदारीत काम करणारे कामगार-अधिकारी यांना १५ दिवसांचा पगार बक्षीस म्हणुन दिला आहे याची सुमारे १ कोटी ९ लाख रुपयाची रक्कमही खात्यावर वर्ग केली आहे.ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शेतकरी सभासद, कामगार-अधिकारी, ऊस वाहतुकदार, ऊसतोडणी मजुर, ठेकेदार यांच्या सहकाऱ्याने गत हंगाम यशस्वीपणे पार पाडू असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. सुत्रसंचालन कार्यकारी संचालक आर. एन. यादव यांनी केले. आभार उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी मानले.
.......................

सोमेश्वर कारखान्याकडे येणा-या गाळप हंगामासाठी एकुण ४२ हजार ६८८ एकर ऊसक्षेत्राची नोंद झाली आहे. आडसाली २०७३४ एकर उसक्षेत्राची नोंद झालेली आहे. या नोंदलेल्या एकुण ४२ हजार ६८८ एकर ऊसक्षेत्रातुन बेणे व इतर वजा जाता अंदाजे १५ लाख मे. टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असून  नोंदलेल्या संपुर्ण ऊसाचे वेळेत गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.

पुरुषोत्तम जगताप : अध्यक्ष सोमेश्वर कारखाना.


छायाचित्र : सोमेश्वर कारखान्याच्या रोलर पूजन प्रसंगी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संचालकमंडळ, अधिकारी व कर्मचारी. 

 

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6979,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : 'सोमेश्वर'च्या येणाऱ्या गळीत हंगामात ४२ हजार एकरातील तब्बल १५ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध ! पुरुषोत्तम जगताप
'सोमेश्वर'च्या येणाऱ्या गळीत हंगामात ४२ हजार एकरातील तब्बल १५ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध ! पुरुषोत्तम जगताप
https://lh3.googleusercontent.com/-c6AP7VFVAsU/YtFtzsK0kPI/AAAAAAAASPE/mzTRQ3NsoicpYQrFbNYRnwJbTKvdncicwCNcBGAsYHQ/s1600/1657892291160636-0.png
https://lh3.googleusercontent.com/-c6AP7VFVAsU/YtFtzsK0kPI/AAAAAAAASPE/mzTRQ3NsoicpYQrFbNYRnwJbTKvdncicwCNcBGAsYHQ/s72-c/1657892291160636-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/07/blog-post_61.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/07/blog-post_61.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy