सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा स्मार्ट ग्राम (आर.आर पाटील सुंदरगाव ) हा पुरस्कार भोर तालुक्यातील इंगवली ग्रामपंचायतीला जाहिर झाला आहे.भोर तालुक्यातील दिग्दर्शक अभिनेते कै. दादा कोंडके यांचे गाव असलेल्या इंगवली गावाला पुरस्कार जाहिर झाला असुन सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि दहा लाख रुपयांचे बक्षीस असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भोर तालुक्यात एकूण १५६ ग्रामपंचायती असून या सर्वांमधून २०२१/२२ या सालातील सुंदरगाव पुरस्कार हा इंगवली गावाला मिळालेला आहे.पुणे जिल्हा परिषदेकडून स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. यामध्ये स्थानिक प्रशासन आणि सरपंच सारिका राजेंद्र बांदल,तत्कालीन ग्रामसेवक प्रसाद सोले ,उपसरपंच, ग्रामस्थ ,ग्रामपंचायत सदस्यांनी गाव स्तरावर इतर सर्व राबवलेल्या विविध शासकीय योजना,नागरी सुविधा आरोग्य शिक्षण,कचरा,सांडपाणी,आधुनिक तंत्रज्ञान अशा विविध स्तरांवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे सन २०२१/२२ सालचा सुंदर गाव पुरस्कार इंगवली गावाला मिळाला आहे.