सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : दौलतराव पिसाळ
जिल्ह्यातील पतसंस्थांना कर्ज वसुली प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशनला प्राधिकृत संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे,अशी माहिती संस्थापक-अध्यक्ष जिजाबा पवार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १०१ अन्वये सातारा जिल्ह्यातील पतसंस्थांना वसुली दाखला देण्यासाठी फेडरेशनला राज्याचे अप्पर निबंधक (सहकारी संस्था) यांनी प्राधिकृत संस्था म्हणून नुकतीच मान्यता दिली असल्याची माहिती श्री.पवार,सचिव अनिल जाधव,खजिनदार दिनकर गाढवे यांनी दिली.
फेडरेशनला वसुली प्रमाणपत्र देणे व सुनावणीसाठी सातारा व खंडाळा येथे कार्यालय सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.त्याकरिता प्राधिकृत अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक अजयकुमार भालके यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
मुंबई येथील ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने फेडरेशनच्या कार्यालय व कामकाजासाठी सातारा व खंडाळा येथील जागा मोफत उपलब्ध करून दिली आहे.
फेडरेशनला मिळालेल्या मान्यतेमुळे सातारा जिल्ह्यातील पतसंस्थांना वसुली दाखले लवकर मिळण्यास मदत होणार आहे,त्यामुळे पतसंस्थांची कर्ज वसुली जलद गतीने होण्यास मदत होणार असल्याने जिल्ह्यातील पतसंस्थांचे संचालक,कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.