बारामती पश्चिम ! विठू नामाच्या जयघोषात सोमेश्वर विद्या प्रतिष्ठानचे प्रांगण दुमदुमले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---    
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठाचे, सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल सी.बी.एस.ई. वाघळवाडी येथे आज पूर्व प्राथमिक विभागाचा पालखी सोहळा भक्तीमय, चैतन्यपुर्ण अशा वातावरणात पार पडला. याप्रसंगी पूर्व प्राथमिक विभागातील छोटया वारकऱ्यांनी पारंपरिक वेषभूषा करून खांदयावरून पालखी घेऊन या सोहळयाचा आनंद लुटला.
         पालखी सोहळयाला साजेसे असे गोल उभे रिंगण, वारकऱ्यांच्या विसाव्याच्या वेळी खेळले जाणारे फुगडी, भजन यासारख्या गोष्टींचा आनंद मुलांनी घेतला.
या पालखी सोहळयात विठ्ठल दर्शनाबरोबरच पक्षी संवर्धनासाठीचा संदेश तसेच संदेश फलक फिरविण्यात आले व पर्यावरण साखळीतून लुप्त होत जाणाऱ्या पक्षांच्या संरक्षणासाठी काय उपाय करता येतील याचे मार्गदर्शन मुलांना करण्यात आले.
या सोहळयात अधिक भक्तिरस पूर्ण करण्यात शाळेच्या स्वराधरा संगीत संचाचा मोलाचा वाटा होता.
या प्रसंगी शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद व मुख्याध्यापक  सचिन पाठक उपस्थित होते.
To Top