पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासन अंधारात ? एटीएमच्या विम्याबाबत माहितीच सांगता येईना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
 मोरगाव : प्रतिनिधी
सध्या दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी  ऑनलाइन हा कॉमन पर्याय आहे. यासाठी बहुतेक जणांना एटीएम हे अनिवार्य असतेच. आपण वापरत असलेल्या एटीएमला बँकेकडून नेमक्या कुठल्या सुविधा व लाभ मिळतात हे ग्राहकांना पुरेसं ज्ञात नाही. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत हा सावळा गोंधळ नुकताच समोर आला आहे. बँकेचे अधिकारीच या प्रकरणी अज्ञानात असल्याने ग्राहकांना काय ? सांगणार हा खरा प्रश्न आहे. याबाबत दखल घेण्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी आश्वासन दिले आहे.
     पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधी नुकताच हा प्रकार समोर आला आहे. संबंधित बँकेचे कुठलेही शाखेत आर्थिक व्यवहारांसाठी खाते असलेला ग्राहक व एटीएम धारक यांना विशेष विमा संरक्षण दिले जाते. यासाठी काही ठराविक रक्कम संबंधित खातेदाराच्या खात्यातून कपात करून घेण्याची तरतूद आहे. मात्र; यासाठी विमा संरक्षण व याबाबतचा अर्ज भरून देण्याची ग्राहकांनी आवश्यकता असते. विम्याची रक्कमही अत्यल्प आहे.
    हा लाभ मिळण्यासाठी ग्राहकाने आपले एटीएम कार्ड महिन्याभरात किमान एकदा वापरणे अनिवार्य आहे. या योजनेसाठी असलेले निकष व विमा संरक्षणासाठीचा लाभ ग्राहकांना माहीतच नाहीत. बारामती तालुक्यातील काही शाखांमध्ये विमा संरक्षण हा विषयच नवीन वाटला केवळ अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे चित्र निर्माण झाले आहे गेली पंधरा दिवस माध्यम प्रतिनिधी याबाबत पाठपुरावा करीत आहेत. परंतु अचूक माहिती मिळाली नाही.

 
To Top