सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील जोर गावात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची बैठक दि.६ जुलै रोजी वाई तालुक्यातील सर्व जबाबदार शासकीय अधिकार्यांन समवेत बैठक घेऊन गावात धोकादायक जागेत राहणाऱ्या २६ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरूपात गावातील सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले त्या सोबत गावातील गरोदर महिलांना शासकीय रुग्णालयात ठेवण्याची व्यवस्था या वेळी खबरदारीचा ऊपाय म्हणुन करण्यात आली आहे नागरिकांनी अतीवृष्टीचा अंदाज घेवुन ऊंचीच्या भागावर जाऊन थांबावे .नाले किंवा ओढ्याला घडुळ पाणी आल्यास सर्व ग्रामस्थांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा व काही धोकादायक वाटल्यास तातडीने याची माहिती वाई तहसीलदार अथवा मंडलाधिकारी तलाठी यांना देण्यात यावी असे आवाहन वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी जोर गावात बोलताना केले आहे .
राज्याच्या हवामान खात्याने राज्यात दि.६ .७ .८ .आणी ९ या तारखांना अती मुसळधार पाऊस पडण्याचा गंभीर इशारा दिला आहे या इशार्याची गंभीर दखल वाईचे कर्तव्य दक्ष असलेले तहसीलदार रणजित भोसले यांनी घेऊन गेल्या वर्षी जोर खोर्यातील २२ जुलै रोजी जोर गोळेगाव गोळेवाडी वयगाव दह्याट व जांभळी खोर्यातील जांभळी वाशीवली कोंढावळे किरोंडे या वरील गावांन मध्ये अचानकच अतिवृष्टी झाल्याने एक महिला पाणी आणी मातीच्या प्रवाहात वाहुन गेल्याने तिचा मृत्यू झाला होता लोकांची घरे जनावरे प्रापंचीक साहित्यासह गाडली गेली होती वरील गावांन मधील ओढे नाले तुडूंब भरुन धोक्याची पाणी पातळी ओलांडुन गावा गावातील शिवारात वाट दिशेल त्या दिशेने अती वेगाने ओढ्या नाल्यांचे मुख्य प्रवाह बदलत घुसल्याने पिकांनसह जमीनी आणी रस्ते पुल वाहुन गेल्याने वाईच्या पश्चिम भागात हाहाकार माजला होता प्रशासनाची अतिवृष्टी झालेल्या गावांना आणी तेथील नागरीकांना अती तातडीची मदत पोहचविण्याची प्रामाणिक इच्छा असताना देखील सर्व रस्ते आणी पुलं वाहुन गेल्याने प्रशासनाचे जबाबदार अधिकारी आणी कर्मचारी हे हतबल झाले होते तरी देखील समोर दिसत असलेल्या अतीभयंकर अडचणींचे कडे तोडत तत्कालीन प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर सध्याचे तहसीलदार रणजित भोसले वाई तालुक्यातील सर्व सर्कल ऑफिसर तलाठी शिक्षक ग्रामसेवक यांनी एकत्र येऊन स्वताच्या प्रपंचावर वर तुळशी पत्र
ठेवुन कित्येक किलो मीटर पाठीवर आणी डोक्यावर ओझे घेऊन अतिवृष्टी गावातील नागरीकांना मदत पोहोचविण्यास यशस्वी झाले होते तर काही ठिकाणी बोटीतुन जीवनावश्यक वस्तु नेहुन प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूर कर आणी तहसीलदार रणजित भोसले नागरिकांन पर्यंत पोहचवुन ग्रामस्थांच्या दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था केली होती हा इतिहास ताजा असतानाच याही वर्षी पुन्हा हवामान खात्याने जुलै महिन्यातील दि .६ .७.८.आणी ९ रोजी अती वृष्टीचा गंभीर इशारा दिल्याने त्याची गंभीर दखल घेऊन वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी गेल्या वर्षीची पुनरावृत्ती होऊ नये व त्यावर ऊपाय योजना करण्या साठी म्हणुन दि.६ रोजी जोर गावात तातडीच्या बैठकीचे आयोजन करुन तेथील ग्रामस्थांन सह नायब तहसीलदार वैशाली जायगुडे वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी घोलप पीडल्बुडीचे उपअभियंता श्रीपाद जाधव वाई पंचायत समीतीतील बांधकाम विभागाचे उपअभियंता जाधव वाई तालुका आरोग्य अधिकारी यादव धोम धरणाचे उपअभियंता ठोंबरे पसरणी विभागाचे मंडलाधिकारी राजेंद्र बेलोशे तलाठी विना पुंडे धोमचे मंडलाधिकारी लतीका कोरडे तलाठी संतोष जगताप रेश्मा चव्हाण सचिन वडगुळे अमोल कुंभार या प्रमुख अधिकारी वर्गांच्या ऊपस्थितीत आयोजन करुन अतीवृष्टी सारखे संकट आलेच तर त्याचा सामना कसा करायचा याचे सखोल मार्गदर्शन तहसीलदार रणजित भोसले यांनी केले .
त्याच बरोबर अती धोकादायक असलेल्या जोर गावातील धोकादायक असलेल्या आणी सुरक्षेच्या कारणास्तव २६ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्याचे या वेळी झालेल्या बैठकीत ठरले आहे तर ऊपस्थितीत सर्व खाते प्रमुखांनी आपत्ती व्यवस्थापनाची काय काय तयारी केली यांचाही आढावा या बैठकीत या वेळी घेण्यात आला .