सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरोळ : चंद्रकांत भाट
शिरोळ येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्यावतीने
ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या
मोफत रक्तशर्करा , रक्तदाब व नेत्र तपासणी शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला, या आरोग्य शिबिरात 40 रुग्णांची तपासणी करण्यात आली, जीवन प्रकाश डायग्नोस्टिक सेंटर, जीवन प्रकाश पॅरामेडिकल कॉलेज व लायन्स क्लब, जयसिंगपूर यांच्या
सहकार्याने हे शिबिर झाले,
येथील समस्त कुंभार समाज सभागृहात आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष आत्माराम मुळीक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते,
या शिबिरात सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक माहिती देऊन डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली, प्रसिद्ध धन्वंतरी डॉ प्रकाश दीपंकर, डॉ अभिता दीपंकर ,डॉ शिवाजी पवार यांच्यासह लॅब टेक्निशियन श्रद्धा पाटील, सावन हसबे यांनी आरोग्य शिबिरासाठी योगदान दिले, या शिबिरार्थीना मान्यवरांच्या हस्ते हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले , यावेळी बोलताना नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपचार मोहीम महत्त्वाची असून अशा शिबिरातून आरोग्य बाबत योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळतो , ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या लोकोपयोगी कार्यक्रमास नगरपरिषदेचे सहकार्य राहील असे सांगून त्यांनी नगरपरिषदेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याबाबत कटिबद्ध राहू असे त्यानी सांगितले,
दरम्यान, डॉ अभिता दीपंकर म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या माध्यमातून आरोग्य शिबीर होत आहे, सामाजिक बांधिलकी मानून सेवा देण्यासाठी वैद्यकीय टीम कार्यरत असून वृद्धापकाळात आरोग्य दक्षता महत्वाची आहे, रक्त शर्करा , रक्तदाब तसेच नेत्र तपासणी व उपचार महत्त्वाचे आहेत, शिबिरातील सहभागी ज्येष्ठ नागरिकांना यापुढील आरोग्य सेवा देताना लॅबच्या वतीने 20 टक्के सवलतही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले,
यावेळी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे प्रमुख आत्माराम मुळीक, राजाराम कुंभार , अशोक चौगुले , प्रकाश पाटील, अशोक कांबळे, सदाशिव बेंद्रे, अमरसिंह कांबळे, शिवाजीराव पाटील - कौलवकर, गणपती कुंभार ,सुभाष पाटील यांच्यासह सुभाष माळी, राजेंद्र माने, भाट , सतीश आडगुळे ,एन वाय जाधव यांच्यासह जेष्ठ नागरिक सेवा संघ पदाधिकारी उपस्थित होते, गणपती कुंभार यांनी आभार मानले,
----------