भोर ! कृषीदिनी भोर वनविभागाचे वृक्षारोपण : ६ हेक्टर क्षेत्रावर ५० हजार रोपांची लागवड होणार

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
 भोर वनविभागाच्या वतीने महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून भोर वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले.आठवडाभरात तालुक्यातील ६ हेक्टर क्षेत्रावर ५० हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय मिसाळ यांनी सांगितले.                     वनपरिक्षेत्रात आवळा, चिंच, बोर, कडुलिंबू, वड, पिंपळ, शिसम,कवठ यासह वन्यप्राण्यांना लाभदायक अशा वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.तसेच तालुक्यातील भोलावडे, भोरदरा,नांद,गोकवडी, सांगवी भिडे या ठिकाणी हे वृक्षारोपण करण्यात येत असून महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली असल्याचेही मिसाळ म्हणाले.यावेळी भोर तहसीलदार सचिन पाटील,उपविभागीय वनाधिकारी आशा भोंग यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
To Top