सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी पालखी पायवारीला जाणाऱ्या भोर तालुक्याच्या खानापूर परिसरातील श्री ज्ञानेश्वर सेवा दिंडी ट्रस्ट मधील २०० वारकऱ्यांना फलटण येथे शनिवार दि.२ भोरचे जनसेवक अनिल सावले यांनी अन्नदान केले.
सावले म्हणाले अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान असल्याने भविष्यात अन्नदानाचा उपक्रम असाच सुरू ठेवण्यात येणार आहे.तर गेले दहा दिवसांपासून पंढरपूर विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या भक्तांची भेट घेऊन आशिर्वाद घेतला.तर उपस्थितांच्या हस्ते वीणा पूजन करण्यात आले.यावेळी वारकरी भक्तांचा उत्साह व आनंद बघून साक्षात पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन झाल्याचे प्रत्ययास आले.यावेळी राजाराम तुपे, संपत दरेकर, श्याम चव्हाण, आनंदा सावले,श्याम जेधे, गोरख मानकर ,शिवाजी पाटणे, नामदेव बुधे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.