सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील रामराजे वि का सोसायटीच्या वतीने कृषी सप्ताह निमित्त वृक्षारोपण करत ५० झाडे लावण्यात आली.
तालुक्यातील सोसायट्यांच्या कमीत कमी २० ते ३० झाडे लावावीत या बारामती सहाय्यक निबंधक यांच्या अहवानाला प्रतिसाद देत रामराजे सोसायटीने ५० विविध प्रकारची झाडे लावली.
यामध्ये वड, पिंपळ, नांदूर्क, वावळ, कांचन तसेच विविध फुलझाडे यांचा समावेश आहे. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर जगताप, वाणेवाडीचे माजी सरपंच दिग्विजय जगताप, सोसायटीचे संचालक राजेंद्र जगताप,नानासाहेब जगताप, रणजीत जगताप, दादा जाधव, adv. नवनाथ भोसले, शशिकांत जेधे, कैलास भोसले, प्रदीप मांगडे, डी वाय जगताप, राजेंद्र जगताप, कल्याण जगताप, सुनील चव्हाण, सचिव किरण जगताप, प्रदीप जगताप, अरुण भोईटे, प्रशांत जेधे आदी मान्यवर उपस्थित होते.