सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा मोरगाव रस्त्यावर चौधरवाडी नजीक रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्यात दुचाकीसह एकजण पडुन ठार झाला आहे.
सुनिल साहेबराव भोर रा. खडकवाडी, भोरवाडी जि. अहमदनगर हे अपघातात ठार झाले आहेत. याबाबत चौधरवाडीचे पोलीस पाटील राजकुमार नामदेव शिंदे रा. चौधरवाडी ता. बारामती यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांत खबर दिली.
जबाबात म्हणटले आहे की, काल ता. ०३/०७/२०२२ रोजी ९.३० वा. चे सु॥ मी आमचे घरी असताना जय मल्हार हॉटेलचे मालक आण्णा राजपुरे यांनी त्यांचे फोनवरून फोन करून कळविले की, आपले चौधरवाडी ता. बारामती गावात निरा ते मोरगाव जाणारे रोडवर चौधरवाडी घाटाजवळ ओढयांचे पुलाचे काम चालु असलेले ठिकाणी एक मोटार सायकल स्वार त्यांचे मोटार सायकलसह रोडचे खंडयात पडुन . त्यात तो जखमी झालेला आहे तुम्ही लवकर या ठिकाणी या असे कळविल्याने मी सदर बाबत समक्ष निरा ते मोरगाव रोडवर ओढयाजवळ जावुन पाहणी केली तेथे एक मोटार सायकल तिचा नं. एम.एच.१९ / एच ३८९५ हिचेसह खंडयात पडलेला दिसला त्यांचे चेहऱ्यावर व अंगावर जखमा त्याचे नावे असे नमुद होते त्यानंतर आम्ही सरकारी १०८ रुग्णवाहिका फोन करून बोलावुन घेवुन त्यास उपचारकामी मुर्टी येथील सरकारी दवाखान्यात नेले असता तेथे त्यास प्रथम डॉक्टरांनी तपासणी करून तो मयत झाले असल्याचे सांगितले.