सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
आयएमडीने पुढील पाच दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने भोर आपत्ती व्यवस्थापनाने सर्व यंञणा सज्ज ठेवाव्यात.नागरिकांना रस्ते, आरोग्य अन्नधान्य वीज या सुविधा कायम राहतील यासाठी प्रयत्न करावेत अशा सुचना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
महाड- रस्त्यावरील दरडी पडलेल्या वरंध घाटातील वाघजाई मंदीराजवळील हाँटेल,वारवांड व इतर ठिकाणी तसेच मागील दोन वर्षांपूर्वी भूस्खलन झालेल्या कोंढरी गावाला जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देवून पाहणी केली.यावेळी आयुष प्रसाद यांनी सार्वजनिक बांधकाम,आरोग्य विभाग ,महावितरण कंपनी, पाणी पुरवठा ,ग्रामसेवक यांना सुचना दिल्या. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी स्नेहा देव, ,उपअभियंता इक्बाल शेख,प्रभाकर पाटील,तालुका वैद्यकीय आधिकारी डाँ.सुर्यकांत क-हाळे,विकास सोनवणे,नायब तहसीलदार आदिनाथ गाजरे ,मंडल अधिकारी पांडुरंग लहारे आदींसह शासकीय अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते. मुख्य अधिकारी पुढे म्हणाले अतिवृष्टीमुळे डोंगरातील दरडी रस्त्यावर पडुन रस्ता बंद झाला तर तातकाळ रस्त्यावरील दरडी हाटवा, लोकांना आरोग्यसेवा वेळेवर द्या,पिण्यासाठी पाणी वीजपुरवठा सुरळीत ठेवा,आन्नधान्य पुरवठा व्हावा करा.