सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विद्यार्थी शिक्षकांचे अनुकरण करतात म्हणुनच शिक्षकांनी विद्यार्थीभिमुख होऊन शिकवणे गरजेचे आहे असे मत महाराष्ट्र महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त.राहुल मोरे यांनी व्यक्त केले. सोमेश्वर विद्यालय भागशाळा करंजे येथे.एम.डी. कुचेकर यांच्या सेवापुर्ती गौरव समारंभात ते बोलत होते.
यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष .बाळासाहेब परकाळे, सोमेश्वर कारखान्याचे संचालक.संग्राम सोरटे, .ऋषीकेश गायकवाड, माजी संचालक दादासाहेब मोरे, दिलीप परकाळे, करंजे च्या सरपंच.जया गायकवाड, करंजेपुल चे सरपंच.वैभव गायकवाड, बापुराव सस्ते, सुनिल मोरे, दादा कुचेकर, सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळातील आजी माजी प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
मोरे पुढे म्हणाले की, "शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये समरस होऊन, त्यांचा कल लक्षात घेऊन अध्यापन करायला हवे. मुलं ही देशाची संपत्ती असुन त्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर शारीरिक तंदुरुस्ती देखील महत्वाची आहे. यामध्ये शिक्षक, पालक, शैक्षणिक संस्था व समाजाची भुमिका जबाबदारीची आहे."
सोमेश्वर विद्यालयाचे उपशिक्षक.महादेव कुचेकर हे ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापुर्ती गौरव समारंभावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राहुल मोरे उपस्थित होते. यावेळी संचालक श्री.ऋषीकेश गायकवाड यांच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संग्राम सोरटे, जेष्ठ शिक्षक ए.बी. माळशिकारे आणि सत्कारमूर्ती एम.डी कुचेकर यांच्या वतीने १०० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षक डी.एम. कदम यांच्या वतीने एस.एस.सी. बोर्ड मार्च २०२२ परीक्षेत प्रथम तीन विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब परकाळे, ऋषिकेश गायकवाड, जया गायकवाड, एस.डी. जगताप, एस.एस. गायकवाड, दिलीप सोनवणे, अशोक कोळेकर, ए.बी. माळशिकारे, भावना विटेवर, विद्यार्थिनी गायत्री नलवडे आणि सत्कारमूर्ती एम.डी. कुचेकर यांची भाषणे झाली.
प्रास्ताविक प्राचार्य बी.एस. मिंड यांनी केले. संग्राम भोसले यांनी एम.डी. कुचेकर यांचा जीवनप्रवास परिचयातून उलगडला. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन पर्यवेक्षक एन.ए. निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजे विद्यालयाच्या संपुर्ण स्टाफ ने केले.
सर्व विद्यार्थी व उपस्थितांना कुचेकर सर यांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .ए.सी. डोंबाळे व.एस.एस. खैरे यांनी केले तर आभार एच.एम. गाडेकर यांनी मानले.